शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
5
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
6
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
7
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
8
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
9
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
10
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
11
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
12
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
16
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
17
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
18
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
19
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
20
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाजाचे आंदोलन पेटले

By admin | Updated: July 28, 2014 03:57 IST

या समाजातील युवक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी बारामती बंद करण्यासाठी शहरातून फेरी काढली

बारामती : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याच्या मुद्यावर शनिवारी राज्य सरकारसोबत झालेली चर्चा निष्फळ ठरल्याने यासंदर्भात सुरू असलेले आंदोलन रविवारी पेटले. या समाजातील युवक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी बारामती बंद करण्यासाठी शहरातून फेरी काढली. काही ठिकाणी दगडफेकही केली. जमाव बंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने २४ युवकांना ताब्यात घेऊन नंतर सोडण्यात आले. धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या अंतर्गत आरक्षण मिळावे या मागणीसाठी १६ जणांनी २१ जुलैपासून बारामती शहरात उपोषण आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत कार्यकर्त्यांची शनिवारी रात्री मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक झाली. मात्र, ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे धनगर समाजातील शेकडो युवक बारामतीत रविवारी दाखल झाले. कोणत्याही नेत्यांना न जुमानता त्यांनी शासनाच्या निषेधाच्या घोषणा देत केलेल्या दगडफेकीत पोलिसांच्या सुमो गाडीची काच फुटली. युवा वर्गाने बारामती शहरात फिरून दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. यावेळी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. जमाव बंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने २४ युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. उपोषण आंदोलनाच्या ठिकाणी येणाऱ्या सर्व रस्त्यांवर पोलिसांनी नाकाबंदी केली. पुणे ग्रामीणसह कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, येथील ३७५ पोलीस कर्मचाऱ्यांचा शहरात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी बंदोबस्त वाढविण्यात आला. काही अनुचित प्रकार वगळता नंतर वातावरण शांत झाले. दिवसभर तणावाचे वातावरण होते. नेमकी राज्य सरकारबरोबर चर्चा काय झाली, अशी विचारणा राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांकडून केली जात होती. सरकारने वेळ काढूपणा केल्यामुळे उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना होती. (प्रतिनिधी)