शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

'नक्कीच धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागेल', कृष्णा आंधळेबद्दल पवारांच्या आमदाराने उपस्थित केली शंका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 13:27 IST

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही बेपत्ता आहे. त्याबद्दल शंका उपस्थित करत आमदार संदीप क्षीरसागर यांनी धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागेल, असे म्हटले आहे. 

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख तीन आरोपींपैकी एक असलेला कृष्णा आंधळे अद्यापही बेपत्ता आहे. कृष्णा आंधळेबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी शंका व्यक्त केली आहे. जेव्हा विषय त्यांच्या अंगलट येतो, तेव्हा तो माणूस कधीच सापडत नाही, असे सूचक विधान आमदार क्षीरसागर यांनी केलं आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मुंबईत माध्यमांशी बोलताना आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले, "मला वाटतं नाही की, जो व्यक्ती राहिला आहे, तो सापडणार नाही. आपण त्या भागातील सुरूवातीची समिकरणे बघतो. जेव्हा एखादा विषय त्यांच्या अंगलट येतो, तो माणूस कधीच सापडत नाही, असं दिसतं. मला वाटत नाही हा माणूस सापडेल. जे काही झालं असेल त्याच्यासोबत", असे म्हणत आमदार संदीप क्षीरसागर यांनी आरोपी कृष्णा आंधळेबद्दल शंका व्यक्त केली. 

वाल्मीक कराडला व्हीआयपी ट्रिटमेंट

"मी अजित पवारांच्या नेतृत्वाखाली काम केलेलं आहे. चुकीची गोष्ट झाली, तर ती अजित पवारांना पटत नाही. आमदारांनी विधानसभेत मुद्दा मांडल्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बोलले. पोलीस अधीक्षकांची बदली झाली. आणि जी काही कारवाई तिथे होतेय. पण, मास्टरमाईंड वाल्मीक कराडचा मुद्दा आला की, त्याला व्हीआयपी ट्रिटमेंट दिली जाते", असा आरोप संदीप क्षीरसागर यांनी केला. 

धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागेल -संदीप क्षीरसागर

संदीप क्षीरसागर म्हणाले, "२८ तारखेला मी सभागृहात बोललो होतो की, मास्टरमाईंडला अटक झाली नाही, तर बीड जिल्ह्यातील लोक मोर्चा काढणार.  एका लाखापेक्षा जास्त लोक तिथे जमली होती. माझं अजून एक म्हणणं आहे की, हा गुन्हा दाखल करण्यात १०-१२ तास उशीर झाला. या १०-१२ तासात तिथले पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक, त्या पोलीस ठाण्यातील अधिकारी यांना कोणी फोन केले आणि गुन्हा दाखल करण्यास उशीर केला, हे सीडीआर रिपोर्टमधून कळणार आहे. ही सर्व माहिती घेऊन नक्कीच धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागेल", असे विधान संदीप क्षीरसागर यांनी केले. 

धनंजय मुंडे काय बोलले?

"आता एवढं जर संदीप क्षीरसागरांना माहिती असेल. आणखी कुणा कुणाला काही माहिती असेल, याचा अर्थ मी असा समजतो की, त्यांचे आणि त्या आरोपीचे आता कुठेतरी संबंध आहेत. हे संबंध असल्याशिवाय त्यांना ही माहिती मिळू कशी शकते? त्या कृष्णाला काय झालं, याची पोलिसांना माहिती नाही. तुम्हा-आम्हाला माहिती नाही. तर त्याला (संदीप क्षीरसागर) कशी माहिती असू शकते? याचा अर्थ त्यांचा कुठेतरी संबंध आहे आणि त्या संबंधातून अशा पद्धतीने बातम्या पेरायच्या. आपल्याला ती बातमी मिळते", असे उत्तर धनंजय मुंडेंनी दिले.

टॅग्स :walmik karadवाल्मीक कराडBeedबीडCrime Newsगुन्हेगारीDhananjay Mundeधनंजय मुंडे