Walmik Karad : धनंजय मुंडेंकडून वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरचा प्रयत्न; कासलेंचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 11:00 IST2025-04-15T11:00:14+5:302025-04-15T11:00:44+5:30

Walmik Karad : बीड पोलिस मधील निलंबित अधिकारी रणजीत कासले यांनी गेल्या काही दिवसापासून वेगवेगळे दावे केले आहेत.

Dhananjay Munde attempts to set up an encounter with walmik Karad Kasle makes serious allegations | Walmik Karad : धनंजय मुंडेंकडून वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरचा प्रयत्न; कासलेंचा गंभीर आरोप

Walmik Karad : धनंजय मुंडेंकडून वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरचा प्रयत्न; कासलेंचा गंभीर आरोप

Walmik Karad ( Marathi News ) : बीड पोलिस मधील निलंबित अधिकारी रणजीत कासले यांनी गेल्या काही दिवसापासून वेगवेगळे दावे केले आहेत. काल त्यांनी  वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर होती असा दावा केला होता. दरम्यान, आता या दाव्यावरुनच एक गौप्यस्फोट केला आहे. वाल्मीक कराड याच्या एन्काऊंटरची सुपारी धनंजय मुंडे यांनीच दिली होती, असा गौप्यस्फोट कासले यांनी केला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय, यामध्ये त्यांनी महाराष्ट्र पोलिसांना चॅलेंजही दिले आहे. 

वाल्मीक कराडचा एन्काऊंटर करण्याची ऑफर; निलंबित पोलीस अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा

धनंजय मुंडे यांच्याकडून वाल्मीक कराड याच्या एन्काऊंटरचा प्रयत्न केल्याचा दावा कासले यांनी केला. तसेच पोलिसांनी आपल्याला पकडून दाखवावे असं आवाहनही त्यांनी दिले. कासले यांनी व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, काल मी वाल्मीक कराड याच्या संदर्भात मी माझ मत मांडलं. तर काल माझ्याविरोधात गुन्हा दाखल झाला, मी काल मुलाखतीमध्ये सांगितले की काहीतरी लपवण्यासाठी हे केलं. एन्काऊंटर कुणी करण्यासाठी ऑफर दिली होती, त्यांच मी आज नाव सांगतो. ते म्हणजे धनंजय मुंडे आहेत. कारण धनंजय मुंडे यांची सर्व माहिती त्यांना माहिती होती. वाल्मीक कराड सर्व बाहेर काढणार होते, असा मोठा गौप्यस्फोट रणजित कासले यांनी केला.

पोलिसांना दिले चॅलेंज 

"मुंडेंना आरोप केले जाणार नाही, कारण सर्व पुरावे दाबले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा त्यांना पाठिंबा आहे. महाराष्ट्र पोलिसांनी मला पकडून दाखवावे. मी त्यांना ओपन चॅलेंज देतो. त्यांनी कितीही टीम पाठवू द्या. मी रोज स्टेट बदलणार, सीम कार्ड बदलणार, असंही कासले म्हणाले. 


कासलेंचा मोठा दावा 

रणजीत कासले यांनी व्हिडिओ पोस्ट करत म्हटलंय की, मी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरची बातमी पाहिली. या ५ पोलिसांवर गुन्हे दाखल करा आणि एसआयटी बसवा असं कोर्टाने म्हटलं. एसआयटी बसवून काही उपयोग होणार नाही. जर चौकशी करायची असेलच तर केंद्राची यंत्रणा बसवा, मग त्यातून सत्य बाहेर पडेल. फेक एन्काऊंटर कसे होतात हे मी सांगतो. ज्यावेळी मला वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर दिली होती पण मी नकार दिला. एन्काऊंटरसाठी मोठी रक्कम ऑफर दिली जाते, १०, २०, ५० कोटी इतके दिले जातात. तुम्ही बोलाल तेवढे पैसे देतात. मी सायबर शाखेत होतो, पण मी हे करू शकतो हे माहिती असल्याने त्यांनी मला ऑफर दिली होती असं त्यांनी सांगितले.

Web Title: Dhananjay Munde attempts to set up an encounter with walmik Karad Kasle makes serious allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.