'बाजी पलटने में देर नहीं लगती'; धनंजय मुंडेंचं सेना-भाजपवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 02:10 PM2019-07-28T14:10:07+5:302019-07-28T14:23:31+5:30

सत्तेचा गैरवापर करून विरोधी पक्षांच्या नेत्यांना फोडण्याची एक अनिष्ठ राजकीय परंपरा महाराष्ट्रात भाजप-सेनेच्या सरकारने सुरू केली आहे.

Dhananjay Munde Attack shivsena-BJP | 'बाजी पलटने में देर नहीं लगती'; धनंजय मुंडेंचं सेना-भाजपवर टीकास्त्र

'बाजी पलटने में देर नहीं लगती'; धनंजय मुंडेंचं सेना-भाजपवर टीकास्त्र

Next

मुंबई -  विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेनेत विरोधी पक्षाच्या नेत्यांचा पक्षप्रवेशाचा धडाकाच सुरु असल्याचे पहायला मिळत आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विद्यमान आमदारांनी भाजपमध्ये जाण्याची जणू रांगच लावली आहे. भाजप-शिवसेनेच्या फोडाफोडीच्या राजकरणावर विरोधीपक्ष नेते धनजंय मुंडेनी टीका केली आहे. सरकार येत असतात जात असतात, 'बाजी पलटने में दर नहीं लगती' असा टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.

धनंजय मुंडे म्हणाले की, सत्तेचा गैरवापर करून विरोधी पक्षांच्या नेत्यांना फोडण्याची एक अनिष्ठ राजकीय परंपरा महाराष्ट्रात भाजप-सेनेच्या सरकारने सुरू केली आहे. भाजप-सेनेच्या कारकिर्दीत अनेक गंभीर भ्रष्ट्राचाराची प्रकरणे घडली आहेत. आघाडी सरकार आल्यास या भ्रष्ट नेत्यांवर कारवाई करण्यासाठी आम्हाला सत्तेचा गैरवापर करण्याचीही गरज राहणार नाही. परिस्थिती अशी होईल की त्या भ्रष्ट नेत्यांना एक दिवसही स्व:पक्षात राहणे अवघड होऊन जाईल. सरकार येत असतात जात असतात, 'बाजी पलटने में देर नहीं लगती' असा खोचक टोला त्यांनी भाजप-शिवसेनेला लगावला.

पक्षांतराचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादी काँग्रेसलाच बसत असून पक्षाध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांची चिंता वाढली आहे. राष्ट्रवादीतील २० नेत्यांनी पक्षांतर केले. तर काही जन अजूनही वेटिंगवर आहे. महत्वाचे म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि माजी मंत्री सचिन अहिर आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पक्षाला दिलेल्या सोडचिठ्ठीमुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

Web Title: Dhananjay Munde Attack shivsena-BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.