Devendra Fadanvis on MLA Suspension: 'लोकशाही वाचविणारा ऐतिहासिक निकाल'; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 12:50 PM2022-01-28T12:50:47+5:302022-01-28T12:50:56+5:30

Devendra Fadanvis on MLA Suspension: 'हा केवळ 12 आमदारांच्या निलंबनाचा प्रश्न नव्हता, तर त्या मतदारसंघातील 50 लाखाहून अधिक मतदारांचा प्रश्न होता. आज लोकशाहीचे संरक्षण झाले.'

Devendra Fadnavis | BJP MLA | Supreme Court | Devendra Fadnavis first reaction on Supreme Court's decision BJP MLA Suspension | Devendra Fadanvis on MLA Suspension: 'लोकशाही वाचविणारा ऐतिहासिक निकाल'; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Devendra Fadanvis on MLA Suspension: 'लोकशाही वाचविणारा ऐतिहासिक निकाल'; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Next

पणजी: राज्य सरकारने विधानसभा अधिवेशनात भारतीय जनता पक्षाच्या 12 आमदारांना निलंबित केले होते. पण, आता भाजपच्या या 12 आमदारांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. या निर्णयाचे भाजपकडून स्वागत केले जात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) हे सध्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आहेत. यावेळी त्यांनीही या निर्णयाचे स्वागत केले आणि 'सत्यमेव जयते' अशी प्रतिक्रिया दिली.

'लोकशाही वाचविणारा ऐतिहासिक निकाल' 
देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. 'राज्य विधिमंडळात ओबीसींच्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या भाजपाच्या 12 आमदारांचे बेकायदेशीर निलंबन रद्द ठरविणारा, लोकशाही वाचविणारा आणि ऐतिहासिक निकाल दिल्याबद्दल मा. सर्वोच्च न्यायालयाचे मन:पूर्वक आभार या निकालाचे आम्ही स्वागत करतो. हे निलंबन रद्द झाल्याबद्दल भाजपाच्या 12 आमदारांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो', असे फडणवीस म्हणाले.

'आज लोकशाहीचे संरक्षण झाले' 
तसेच, 'कुठलेही कारण नसताना आणि इतक्या प्रदीर्घ कालावधीसाठी निलंबन हे असंवैधानिक आहे, केवळ कृत्रिम बहुमतासाठी ते करण्यात आले, हे आम्ही प्रारंभीपासूनच सांगत होतो. आज सर्वोच्च न्यायालयाने तेच सांगितले. हा केवळ 12 आमदारांच्या निलंबनाचा प्रश्न नव्हता, तर त्या मतदारसंघातील 50 लाखाहून अधिक मतदारांचा प्रश्न होता. आज लोकशाहीचे संरक्षण झाले', अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे.

काय आहे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ?
गेल्या वर्षी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ओबीसी आरक्षणाच्या ठरावावर विधानसभेत चर्चा सुरू असताना राजदंड उचलणं, माईक खेचणं, त्याचबरोबर अध्यक्षांच्या दालनात तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना धक्काबुक्की करणं, शिवीगाळ करणं, अपशब्द वापरून गैरवर्तन करणं, यासाठी भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं होतं. याविरोधात भाजपनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज सर्वोच्च न्यायालयाने निलंबनाची कारवाई रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.

या आमदारांचे निलंबन मागे
न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर, न्या. दिनेश माहेश्वरी, न्या. सी. टी. रविकुमार यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी झाली. या याचिकेवरील सर्व युक्तिवाद गेल्या आठवड्यात संपले. न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. आज न्यायालयाने या प्रकरणात निकाल दिला. यानंतर भाजपच्या आशिष शेलार (वांद्रे पश्चिम),अभिमन्यू पवार (औसा),गिरीश महाजन (जामनेर),पराग अळवणी (विलेपार्ले),अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व),संजय कुटे (जामोद, जळगाव),योगेश सागर (चारकोप),हरीश पिंपळे (मूर्तीजापूर),जयकुमार रावल (सिंधखेड),राम सातपुते (माळशिरस),नारायण कुचे (बदनपूर, जालना),बंटी भांगडिया (चिमूर) या आमदारांचे निलंबन मागे घेतले आहे.

Web Title: Devendra Fadnavis | BJP MLA | Supreme Court | Devendra Fadnavis first reaction on Supreme Court's decision BJP MLA Suspension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app