Devendra Fadnavis to attend the 53rd foundation day event of Shiv Sena | शिवसेनेच्या स्थापना दिवसाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार 
शिवसेनेच्या स्थापना दिवसाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार 

मुंबई - जुने वादविवाद विसरून लोकसभा निवडणुकीपूर्वी नव्याने युती करणाऱ्या भाजपा आणि शिवसेनेने घवघवीत यश मिळवले होते. आता काही महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही या यशाची पुनरावृत्ती करण्याची मोर्चेबांधणी दोन्ही पक्षांनी सुरू केली असून, त्यासाठी दोन्ही पक्षांमधील सुसंबंध कायम ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून बुधवारी होणाऱ्या शिवसेनेच्या स्थापना दिवसाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत. 

 शिवसेनेचा ५३वा स्थापना दिवस बुधवारी साजरा होणार आहे. त्यानिमित्त शिवसेनेकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर शिवसेना आणि भाजपामध्ये पुन्हा एकदा वर्चस्वाची लढाई सुरू झाली असून, मुख्यमंत्रीपदावरून दोन्ही पक्षांमध्ये मतभेद निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची शिवसेनेच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमामधील उपस्थिती लक्षवेधी ठरणार आहे.  


Web Title: Devendra Fadnavis to attend the 53rd foundation day event of Shiv Sena
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.