बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 05:26 PM2024-05-01T17:26:03+5:302024-05-01T17:27:29+5:30

शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियावर जोरदार टीका केली आहे

Maharashtra Politics MLA Bharat Gogawle criticizes Uddhav Thackeray family | बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले

बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले

Bharat Gogawale : शिवसेनेच्या फुटीला जवळपास दोन वर्षे होतं आली तर शिंदे गट  आणि ठाकरे गटातील नेत्यांचा एकमेकांविषयी असलेला रोष कमी होताना दिसत नाहीये. गेल्या कित्येक महिन्यांपासून दोन्ही गटाचे नेते एकमेकांवर पातळी सोडून टीका करताना दिसतायत. काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडून पुरेसा निधी मिळत नसल्याची तक्रार आणि पक्षप्रमुखांची वागणूक अशी विविध कारणं देत शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली.पक्षातून बंडखोरी करत शिवसेनेच्या आमदारांनी भाजपच्या साथीने राज्यात महायुतीचे सरकार स्थापन केलं. मात्र आता या फुटीसाठी ठाकरे कुटुंबियांतील सदस्यदेखील जबाबदार असल्याचं मोठं विधान शिंदे गटाच्या आमदाराने केलं आहे.

मुंबईत तकला दिलेल्या मुलाखतीमध्ये शिंदे गटाचे आमदार भरत गोगोवले यांनी आता शिवसेनेच्या फुटीबाबत मोठा दावा केला आहे. घरच्या मंडळींनी राजकारणात हस्तक्षेप केला म्हणजे रामायण, महाभारत घडलं समजायचं. रामायणात कैकयीने हस्तक्षेप केला होता, त्यामुळेच इतकं मोठ रामायण घडलं. जर कैकयीने त्यावेळी दशरथाला सांगितलं नसतं तर दशरथाने रामाला वनवासात पाठवलं नसतं आणि रामायणही घडलं नसतं, असं म्हणत भरत गोगावलेंनी ठाकरे कुटुंबियांवर निशाणा साधला.

"महिलेने सहकार्य करावं, आलेल्या गेलेल्यांचा मान ठेवायला पाहिजे. जसं आमच्या माँ साहेब ठेवायच्या. एखाद्या नेत्यावर जर बाळासाहेब रागावले तर माँ साहेब त्याला जवळ करायच्या. पण याउलट उद्धव ठाकरेंच्या इथे घडतंय. बाळासाहेब मुख्यमंत्री होऊ शकले असते पण त्यांनी मुख्यमंत्रीपद घेतलं नाही. त्यांनी मनोहर जोशी आणि नारायण राणेंना मुख्यमंत्रीपद दिलं. कुठल्याच नातेवाईकाला त्यांनी मंत्रिमंडळात घेतलं नाही हा फरक आहे," असंही म्हणत गोगावलेंनी ठाकरे कुटुंबियांवर निशाणा साधला. 

"शिवसेना फुटीला संजय राऊत एकटे कारणीभूत नाही. महिलेने किती हस्तक्षेप करावा, हा त्यातला मतितार्थ मी सांगितला. राजकारणात पडद्याच्या मागे असलेल्या महिलेने हस्तक्षेप करुन नये. नवरा चुकत असेल तर महिलेने त्याला सल्ला द्यावा. मुलगा चुकत असेल तर त्याला समजून सांगावं. पण सगळा गोतावळा, नाती गोती तुम्ही भरलीत तर राजकारणाचा जय महाराष्ट्र झालाच समजा.  मी मगाशी माँ साहेबांचं उदाहरण दिलं. कधी माँ साहेबांनी बाळासाहेबांच्या निर्णयात हस्तक्षेप केला का? बाळासाहेब ओरडले तर माँ साहेब त्याला जवळ करायच्या, समजावायच्या. त्यावेळी एक तरी शिवसैनिक बाजूला झाला का? त्यामुळे समजणे वाले को इशारा काफी है!," असंही भरत गोगावले म्हणाले.
 

Web Title: Maharashtra Politics MLA Bharat Gogawle criticizes Uddhav Thackeray family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.