मुख्यमंत्री फिट अ‍ॅण्ड फाईन; प्रकृती बिघडल्याचं वृत्त निराधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 16:29 IST2019-02-14T16:26:56+5:302019-02-14T16:29:05+5:30

प्रकृती बिघडल्याचं वृत्त चुकीचं असल्याची सीएमओची माहिती 

devendra fadnavis absolutely fine cmo clarifies after rumors comes out about cms health | मुख्यमंत्री फिट अ‍ॅण्ड फाईन; प्रकृती बिघडल्याचं वृत्त निराधार

मुख्यमंत्री फिट अ‍ॅण्ड फाईन; प्रकृती बिघडल्याचं वृत्त निराधार

औरंगाबाद: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकृती बिघडल्याचं वृत्त पूर्णपणे निराधार असल्याची माहिती सीएमओनं दिली. औरंगाबाद दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांची प्रकृती बिघडल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलं होतं. याबद्दल 'लोकमत'नं मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधला असता, संबंधित वृत्त चुकीचं असल्याची माहिती त्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांची प्रकृती उत्तम असल्याचं सीएमओकडून स्पष्ट करण्यात आलं. 

'मुख्यमंत्र्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना औरंगाबादचा दौरा अर्धवट सोडावा लागला. मुख्यमंत्री बुलडाण्यावरुन वाशिमकडे निघाले असताना त्यांची तब्येत बिघडली. त्यामुळे ते थेट औरंगाबादकडे रवाना होऊन तिथून मुंबईकडे येत आहेत,' असं वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दिलं होतं. मुख्यमंत्र्यांना पोटदुखी आणि डोकेदुखीचा त्रास होत असून त्यांच्या तपासणीसाठी डॉक्टरांचं एक पथक विमानतळावर पोहोचल्याचं वृत्तदेखील देण्यात आलं होतं. मात्र ही संपूर्ण माहिती निराधार असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयानं स्पष्ट केलं. 
 

Web Title: devendra fadnavis absolutely fine cmo clarifies after rumors comes out about cms health