शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

सिडनीच्या धर्तीवर बंदरांचा विकास

By admin | Updated: August 18, 2016 05:09 IST

वेसाव्यासह राज्यातील प्रमुख मासेमारी बंदरांचा सिडनीच्या धर्तीवर सर्वांगिण विकास करणार असल्याचे आश्वासन मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी दिले.

मुंबई : वेसाव्यासह राज्यातील प्रमुख मासेमारी बंदरांचा सिडनीच्या धर्तीवर सर्वांगिण विकास करणार असल्याचे आश्वासन मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी दिले. शिवाय मत्स्यसंशोधन केंद्र हैद्राबादऐवजी वेसाव्याला आणण्यासाठी आपण ठोस प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.वेसावे येथे बुधवारी दुपारी साजरा करण्यात आलेल्या नारळी पौर्णिमेच्या सणात महादेव जानकर यांनी उत्साही सहभाग नोंदवला. यावेळी कोळीबांधवांशी दिलखुलास संवाद साधला. ते म्हणाले, वेसाव्याभोवताली वीस मजली गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या. मात्र कोळीबांधवांच्या घरांचा प्रश्न सुटलेला नाही ही खेदाची बाब आहे. मच्छीमार सोसायटयांना डीझेल परतावा लवकर मिळावा. वेसावे खाडीतील तीन लाख क्युबिक गाळ काढण्यात यावा. कोळी बांधवांच्या घरांचा प्रश्न सुटावा. कोळी बांधवांच्या जातीच्या दाखल्यांचा प्रश्न सुटावा. चित्रा-खलीजा जहाजांच्या टकरीत नुकसान झालेल्या मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशा अनेक मागण्या सोडवण्यासाठी कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले. (प्रतिनिधी)- महादेव जानकर यांनी यावेळी कोळी पेहराव परिधान केला होता. वेसावे येथील मसानदेवी मंदिरापासून डोगरी गल्लीपर्यंत काढण्यात आलेल्या मिरवणूक ते सहभागी झाले होते. ही मिरवणूक मांडवीगल्ली मार्गे बाजारगल्लीमागील बंदरावर पोहचली. यावेळी त्यांनी समुद्राला सोन्याचा मुलाला दिलेला नारळ अर्पण केला.- वेसावे गावातील ९ विविध गल्यांमध्ये कोळी गीतांच्या ठेक्यावर नारळी पौर्णिमेच्या मिरवणुका निघाल्या. तेरे गल्ली, बुधा गल्ली, गोमा गल्ली, पाटील गल्ली, बाजार गल्ली, मांडवी गल्ली, डोंगरी गल्ली, शिव गल्लीच्या अध्यक्षांनी सोन्याचा मुलामा दिलेला नारळ समुद्राला अर्पण केला. - नारळीपोर्णिमेच्या निमित्याने घरात केलेल्या नारळाच्या करंज्याचा (पूर्ण्या) नैवेदय आपल्या बोटींना दाखवून पूजा केली. ‘सुमद्राची मनोभावे पूजा करून खोल मासेमारीला जाणाऱ्या आमच्या धन्याच रक्षण कर आणि यंदा आमच्या बोटीवरील जाळ्यात मुबलक मासोळी गावू दे’, अशी प्रार्थना कोळी महिला केली.- कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील, सरचिटणीस राजहंस टपके, उपाध्यक्ष प्रकाश बोबडी, रामकृष्ण केणी, युवा अध्यक्ष चेतन पाटील, वेसावा कोळी जमातीचे अध्यक्ष मनोज भुनगवले, वेसावा नाखवा मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र काळे, मच्छीमार नेते प्रदीप टपके, वेसावा मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष जयेंद्र लडगे, वेसावा सर्वोदय मच्छीमार सहकारी सोसायटीचे अध्यक्ष जयराज चंदी, पराग भावे, प्रवीण भावे, पृथ्वीराज चंदी, महेंद्र लडगे, पंकज जोनचा आदी यावेळी उपस्थित होते.