नाशिकमध्ये वायफाय सिटीसाठी चाचपणी

By Admin | Updated: June 20, 2014 02:34 IST2014-06-20T02:34:36+5:302014-06-20T02:34:36+5:30

मनसेने ‘नाशिक मॉडेल’वर भर देणो सुरू केले असून, त्या पाश्र्वभूमीवर शहरात अनेक कल्पक योजना राबविण्याची घाई झाली आहे.

Detection for Wifi City in Nashik | नाशिकमध्ये वायफाय सिटीसाठी चाचपणी

नाशिकमध्ये वायफाय सिटीसाठी चाचपणी

>नाशिक : लोकसभा निवडणुकीत ठेच लागल्याने सतर्क झालेल्या मनसेने ‘नाशिक मॉडेल’वर भर देणो सुरू केले असून, त्या पाश्र्वभूमीवर शहरात अनेक कल्पक योजना राबविण्याची घाई झाली आहे. संपूर्ण शहर वायफाय सिटी करण्यात येणार असून, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी ट्राम सेवेच्या पर्यायाची चाचणी करण्यात येणार आहे. राज ठाकरे यांनी नाशिक दौ:यावर यासंदर्भात सूतोवाच केले आहे.
लोकसभा निवडणुकीत मनसेचे नाशिक मॉडेल अपयशी ठरल्याच्या टीकेने राजकीय फटका बसलेल्या राज यांनी आता सहा महिन्यांत नाशिकच्या विविध प्रकल्पांना आकार देण्याची तयारी केली आहे. गोदापार्कच्या धर्तीवर खासगी प्रायोजकांमार्फत योजना राबविण्याचा मानस बाळगणा:या राज यांनी ईएसडीएस कंपनीच्या सहकार्याने संपूर्ण शहर वायफाय सिटी करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. कंपनीचे सीईओ पीयूष सोमाणी यांनी राज यांची दुपारी विश्रमगृहावर भेट घेतल्यानंतर राज यांनी हा प्रस्ताव मार्गी लावण्याची सूचना केली आहे. अशाच प्रकारे शहरात ट्राम सुरू करण्याच्या पर्यायाची चाचपणी करण्यासंदर्भात पदाधिका:यांशी चर्चा झाली आहे. पांडवलेण्याच्या पायथ्याशी असलेले नेहरू वनउद्यान वनविभागाकडे तसेच ठेवून केवळ सुशोभीकरणासाठी वनखात्याकडे मागण्यात आले आहे. टाटा कंपनीने तेथे बॉटनिकल गार्डन साकारण्याची तयारी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Detection for Wifi City in Nashik