“जिवाभावाचा माणूस…”; सुनेत्रा पवारांची भावुक पोस्ट, अजितदादांचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 17:38 IST2026-02-28T17:36:07+5:302026-02-28T17:38:19+5:30

Sunetra Ajit Pawar Social Media Post: अजितदादांच्या निधनाला एक महिना झाला असून, सुनेत्रा पवारांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. यासोबत १० मिनिटांचा अजितदादांचा एक व्हिडिओही शेअर केला आहे.

deputy cm sunetra pawar a emotional post after one month of ajit pawar sad demise and shared video will make your eyes water | “जिवाभावाचा माणूस…”; सुनेत्रा पवारांची भावुक पोस्ट, अजितदादांचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

“जिवाभावाचा माणूस…”; सुनेत्रा पवारांची भावुक पोस्ट, अजितदादांचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Sunetra Ajit Pawar Social Media Post: जिवाभावाचा माणूस… काही माणसं पदाने मोठी असतात… काही कामाने मोठी असतात… पण अजितदादा मनाने मोठे होते, म्हणूनच ते आपले होते. माणुसकीची खोल जाण त्यांच्या प्रत्येक कृतीतून जाणवायची. कामाबद्दलची त्यांची अखंड प्रामाणिक तळमळ ही केवळ जबाबदारी नव्हती, ती त्यांची जीवनशैली होती. समाजासाठी झटणं हे त्यांच्यासाठी कर्तव्य नव्हतं… ती त्यांची श्रद्धा होती, असे म्हणत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजितदादांबद्दल अत्यंत हळवी पोस्ट शेअर केली आहे. यासोबत अजित पवार यांचा एक १० मिनिटांचा व्हिडिओ शेअर केला आहे. 

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाला एक महिना पूर्ण झाला. अद्यापही संपूर्ण महाराष्ट्र अजित पवार यांच्या निधनाबाबत हळहळ व्यक्त करताना दिसत आहे. या महिन्याभरात अनेक घडामोडी घडल्या. रोहित पवारांनी या विमान अपघातावर शंका व्यक्त करत अनेक प्रश्न उपस्थित केले. तर दुसरीकडे सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद, पालकमंत्रीपद आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारत राजकारणात सक्रीय सहभागी झाल्या आहेत. यातच अजित पवार यांच्या जाण्याच्या धक्क्यातून अजूनही सुनेत्रा पवार सावरल्याचे पाहायला मिळत आहे. 

ते फक्त नेता नव्हते… ते आधारवड होते!

एक्सवर एक पोस्ट करत सुनेत्रा पवार यांनी अजितदादांच्या आठवणी जागवल्या आहेत. जनहितासाठी सत्ता वापरण्याची त्यांची ठाम भूमिका, दूरदृष्टीतून आखलेले विकासाचे मार्ग आणि कामातून कमावलेला जनतेचा अपार विश्वास, हेच त्यांच्या आयुष्याचं खरं सार होतं. स्वभावाने दिलदार… आपुलकीने माणसं जोडणारे… आणि निर्णयाच्या वेळी तितकेच रोखठोक, ठाम आणि विकासाभिमुख नेतृत्व, ही त्यांची वेगळीच ओळख होती. ते फक्त नेता नव्हते… ते आधारवड होते! प्रत्येक समाजघटकाला साथ देत, प्रत्येक अडचणीत खंबीर उभं राहत, “विकासाचे राजकारण” त्यांनी केवळ बोलून नाही, तर कृतीतून जगून दाखवलं. आज त्यांच्या उणीवेची वेदना मनाला खोलवर बोचते… कारण हरवलं आहे ते फक्त नेतृत्व नाही, हरपलाय एक जिवाभावाचा माणूस.

प्रत्येक कामात त्यांचं प्रतिबिंब कायम दिसत राहील

पण त्यांच्या आठवणी दुःख देत नाहीत, त्या प्रेरणा देतात. त्यांची कार्यतत्परता, त्यांची जिद्द आणि राष्ट्रवादी परिवाराला दिलेलं बळ, हेच आपल्याला पुढे चालत राहण्याची नवी उर्जा देत राहील. अजितदादा शारीरिकरित्या आपल्यात नसले तरी… त्यांचे विचार आपल्या ध्येयात जिवंत आहेत. त्यांचे संस्कार आपल्या कृतीत जिवंत आहेत आणि त्यांच्या स्वप्नांचा वारसा आपल्या प्रत्येक पावलात जिवंत आहे. अजितदादा सदैव आपल्या स्मरणात…
आपल्या विचारांत… आपल्या कृतीत… आणि आपल्या प्रत्येक कामात त्यांचं प्रतिबिंब कायम दिसत राहील, असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे.

Web Title : सुनेत्रा पवार की भावुक पोस्ट: अजित पवार की यादें

Web Summary : सुनेत्रा पवार ने अजित पवार को भावभीनी श्रद्धांजलि दी, उनके मानवता और समर्पण पर प्रकाश डाला। उन्होंने एक नेता और एक सहायक प्रणाली के रूप में उनकी भूमिका पर जोर दिया, उनकी अनुपस्थिति से बने शून्य पर ध्यान दिया। विकास और जनसेवा के प्रति उनकी प्रतिबद्धता प्रेरणा देती है।

Web Title : Sunetra Pawar's emotional post: Remembering Ajit Pawar's heartfelt legacy.

Web Summary : Sunetra Pawar shared a touching tribute to Ajit Pawar, highlighting his humanity and dedication. She emphasized his role as a leader and a support system, noting the void his absence creates. His commitment to development and public service continues to inspire.