“डॉक्टर नसलो, तरी मोठी ऑपरेशन करतो!”; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जोरदार फटकेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 11:43 IST2025-11-16T11:40:04+5:302025-11-16T11:43:57+5:30

Deputy CM Eknath Shinde News: मी गावाला आलो की विरोधकांचा स्ट्रेस वाढतो. महाराष्ट्राला अपेक्षित असलेले मोठे ऑपरेशन मी काही वर्षांपूर्वी यशस्वी केले, अशी टोलेबाजी एकनाथ शिंदे यांनी केली.

deputy cm eknath shinde said even if i am not a doctor i will perform major operations | “डॉक्टर नसलो, तरी मोठी ऑपरेशन करतो!”; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जोरदार फटकेबाजी

“डॉक्टर नसलो, तरी मोठी ऑपरेशन करतो!”; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जोरदार फटकेबाजी

Deputy CM Eknath Shinde News: थंड हवेचं ठिकाण, स्ट्रॉबेरीची गोडी आणि डॉक्टरांचा महासमागम, अशा परिपूर्ण वातावरणात MAPCON 2025 च्या व्यासपीठावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या खास हटके स्टाईलमध्ये भाषणाची चुरस चांगलीच वाढवली. मी पेशाने डॉक्टर नाही… पण छोटी-मोठी राजकीय ऑपरेशन अगदी सहज करून टाकतो. महाराष्ट्राला अपेक्षित असलेलं मोठं ऑपरेशन मी काही वर्षांपूर्वी यशस्वी केले!, अशा भन्नाट वाक्याने सभागृहात हशा आणि टाळ्यांचा वर्षाव झाला.

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील हॉटेल ड्रीमलँड मध्ये महाराष्ट्र असोसिएशन ऑफ फिजिशियन्स आयोजित संमेलन (MAPCON) - २०२५ पार पडले. त्याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. डॉ. हिरेमठ यांच्या ८ हजार हृदयांवर केलेल्या यशस्वी उपचारांचा गौरव करताना शिंदे म्हणाले 
तुम्ही हृदय बरे करता… आणि आम्ही कधी-कधी लोकांच्या हृदयाचे ठोके चुकवतोही! पण महाराष्ट्राच्या हितासाठी जे लागेल तेच करतो.

 तुम्ही देवदूत आहात

कोरोना काळातील भीषण आठवणी सांगताना शिंदे भावुक झाले. मी स्वतः PPE किट घालून रुग्णांना भेटत होतो, रात्री १२ वाजता ऑक्सिजन संपत असल्याचे फोन यायचे, राज्यभर लहान-मोठे ऑक्सिजन प्लांट उभारले, डॉक्टरांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांना वाचवले. तुम्ही देवदूत आहात. डॉक्टरांच्या तीन दिवसांच्या कॉन्फरन्सचा उल्लेख करत ते म्हणाले की,  डॉक्टरही २४/७ काम करतात. म्हणून महाबळेश्वरची हवा तुमच्यासाठीही औषधच! मी गावाला आलो की विरोधकांचा स्ट्रेस वाढतो. सातारचे लोक कंदीपेढ्यासारखे गोड आणि त्यांच्या हृदयात स्ट्रॉबेरी! मी डॉक्टर नसलो तरी राजकीय बायपास करतो, असा टोला लगावताना, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, टेलीमेडिसिन, ग्रामीण भागात पोहोचणाऱ्या सेवांचा विस्तार हा काळ बदलण्याचा आहे, असे शिंदे यांनी नमूद केले.

दरम्यान, डॉक्टरांच्या कोणत्याही अडचणी शासनस्तरावर सोडवण्याची जबाबदारी माझी आहे आणि तुमचा ‘एक मिनिट’ जसा महत्त्वाचा, तसा तुमचा प्रश्न माझ्यासाठीही महत्त्वाचा आहे. महाबळेश्वरच्या निसर्गरम्य वातावरणात डॉक्टरांच्या परिषदेला उपमुख्यमंत्र्यांच्या राजकीय विनोदाचा तडका मिळाला. वैद्यकीय भाषेतून राजकीय संदेशन दिल्याने संमेलनाचा माहोलच बदलला.

 

Web Title : डॉक्टर नहीं, फिर भी करता हूँ बड़े ऑपरेशन: शिंदे

Web Summary : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने मजाकिया अंदाज में कहा कि वे डॉक्टर नहीं हैं, फिर भी राजनीतिक 'ऑपरेशन' करते हैं, जिसका इशारा उन्होंने अतीत के राजनीतिक फैसलों की ओर किया। उन्होंने कोविड-19 के दौरान डॉक्टरों के जीवन रक्षक कार्यों की सराहना की और उनकी समस्याओं को हल करने में समर्थन का आश्वासन दिया। शिंदे ने स्वास्थ्य सेवा में प्रौद्योगिकी का लाभ उठाने की बात भी कही।

Web Title : Not a doctor, but I do big operations: Shinde

Web Summary : Deputy CM Eknath Shinde humorously claimed he performs political 'operations' despite not being a doctor, referring to past political maneuvers. He praised doctors' life-saving work during COVID-19 and assured support for resolving their issues. Shinde also spoke about leveraging technology in healthcare.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.