शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

दाट धुके व हिरवाईने पोखरीच्या सौंदर्यात भर

By admin | Updated: August 25, 2016 01:50 IST

आंबेगाव तालुक्याचा आदिवासी भाग पर्यटकांना भुरळ घालीत आहे.

कांताराम भवारी,

डिंभे- आंबेगाव तालुक्याचा आदिवासी भाग पर्यटकांना भुरळ घालीत आहे. एकीकडे पर्यटनाबरोबरच देशभरात प्रसिद्ध असणारे श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिर, तर दुसरीकडे आहुपेचा निसर्ग व येथील कोकणेकडे पर्यटकांना नेहमीच खुणावत असतात. या सर्व ठिकाणचा आनंद घ्यायचा असेल तर पहिल्यांदा आपणाला जावे लागते पोखरी घाटात. या घाटाची सफर करूनच पुढे जावे लागते. अलीकडे या घाटातील सौंदर्यही पर्यटकांना खुणावू लागले आहे. घाटातून दिसणारे डिंभे धरण, गोहे पाझर तलावाचे नयनरम्य चित्र, परिसरातील आदिवासींची टुमदार घरे व येथील भातशेतीमुळे हा परिसर सध्या हिरवाईने नटला आहे. त्यातच सकाळी घाटात पडणाऱ्या दाट धुक्यामुळे या भागातील चित्र पालटले असून, बदलू लागलेले पोखरी घाटाचे चित्र पर्यटकांच्या मनाला भुरळ घालू लागले आहे. आंबेगाव तालुक्याचा पश्चिम भाग तसा निसर्गसौंदर्याने नटलेला परिसर आहे. सर्व परिसर हा सह्याद्रीच्या पर्वतरांगांचा प्रदेश असल्याने पावसाळा सुरू होताच या भागात लहान-मोठे धबधबे सुरू होतात. त्यातच एकीकडे देशभरातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे श्रीक्षेत्र भीमाशंकरचे व दुसरीकडे आंबेगाव तालुक्याचे असणारे शेवटचे टोक आहुपे. येथील वनराई व कोकणकडे यामुळे आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागाला निसर्गसौंदर्याचा वारसाच लाभला आहे. एरवी उन्हाळ्यामध्ये सर्वत्र रखरखीत दिसणारा हा प्रदेश पावसाळा सुरू होताच हिरवाईची शाल पांघरतो. हिरवाईने नटलेले उंचच्या उंच डोंगर व खळाळणारे धबधबे पर्यटकांना या भागात येण्यासाठी मोहित करतातच. त्यातच तुडुंब भरलेले डिंभे धरणाचे पाणलोटक्षेत्र येथे येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करत नसेल तरच नवल! या सर्वांचा आनंद लुटायचा असेल तर आपणास पहिल्यांदा जावे लागते ते पोखरी घाटात. हा सातमाळीचा घाट चढल्यावरच आपणास भीमाशंकर खोऱ्यातील पर्यटनाचा खरा आनंद उपभोगता येतो. मात्र, सध्या या घाटातील सौंदर्यानेच पर्यटकांच्या मनाला भुरळ घातल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. आदिवासी भागाचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या डिंभे गावच्या पुढे निघाल्यावर डाव्या बाजूला रस्ता वळतो. तो जातो श्रीक्षेत्र भीमाशंकरकडे. तर उजव्या बाजूचा रस्ता जातो डिंभे धरणाला वळसा घालीत फुलवडे, बोरघर, आडिवरे, माळीणपासून आहुपे या दुर्गम भागातील खेड्यांकडे. डाव्या बाजूकडील रस्त्याने साधारणत: दोन किमीवर गेल्यावर सुरू होतो तो पोखरी घाट. याला सातमाळीचा घाट असेही नाव आहे. वेडीवाकडी वळणे घेत चढाई सुरू करताच पहिल्या वळणावर कोसळणारा धबधबा पाहून भिजण्याचा मोह न होईल तरच नवल. येथील धबधबा पाहताच आपसूकच आपले बे्रकवरील पाय दाबले जातात. येथून पुढे जाताच आपणास उजव्या बाजूस दिसतो तो इंग्रजी व्ही आकाराचा गोहे पाझरतलाव. या तलावाने घाटातील सौंदर्यात मोलाची भर घातली आहे.