मुंबई : राज्यातील भाजपा सरकारने कामगारविरोधी कायदे करण्याचा प्रयत्न केला तर राष्ट्रीय समाज पार्टी अशा कायद्यांना पाठिंबा देणार नाही, असा इशारा पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी विधान परिषदेत दिला.विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी चर्चेचा प्रस्ताव दिला होता. त्यावर बोलताना जानकर म्हणाले की, काही राज्य सरकारांनी कामगारांवर अन्याय करणारे कायदे केले आहेत. राज्यातील सरकारने त्याच धर्तीवर कायदा करण्याचा प्रयत्न केल्यास रासपाचा त्याला पाठिंबा राहणार नाही. कामगार कायद्यात बदल करून दाखवाच, असा इशारा भाई जगताप यांनी दिला, तर युती सरकार असताना माथाडी सल्लागार समितीवर बिगर माथाडी नेमले. वारंवार तक्रारी करूनही सरकारने लक्ष दिले नाही. नवीन कायदा मालकधार्जिणा असल्याचे नरेंद्र पाटील म्हणाले.
कामगारविरोधी कायद्यांना नकार
By admin | Updated: April 1, 2015 02:18 IST