शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
3
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
4
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
5
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
6
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
7
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
8
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
9
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
10
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
11
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
12
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
13
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
14
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
15
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
16
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
17
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
18
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
19
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
20
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव

शेतकरी कायदे मागे घेण्याची मागणी असंवैधानिक आणि लोकशाहीविरोधी : रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 5:55 PM

शेतकरी नेते आंदोलन भडकवत आहेत

पिंपरी : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठीच शेतकरी कायदे आणले आहेत. शेतकऱ्यांना कायदा माहीत नाही. शेतकरी नेतेच आंदोलन भडकावत आहेत. संपूर्ण कायदा मागे घेण्याची मागणी असंवैधानिक आणि लोकशाहीविरोधी आहे, अशा प्रकारची मागणी प्रथमच होत असल्याचे केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले शनिवारी पत्रकार परिषदेत म्हणाले.

शेतकरी आंदोलन मागे घेणे आवश्यक आहे. शेतकरी कायद्याबाबत काही शंका असतील, तर त्या दूर केल्या जातील. कृषी उत्पन्न बाजार समित्यांना धक्का लागणार नाही. त्यांची शेत जमीन बळकावली जाणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे. केंद्रीय कृषी मंत्र्यांनी बारा बैठका घेतल्या. मात्र, शेतकरी नेते ऐकण्यास तयार नाहीत. हे आंदेलन संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचे नाही. पंजाब-हरियाणातील शेतकरी आंदोलनात सहभागी झाले आहे. त्यांना कायद्याची माहिती नाही. नेतेच त्यांना भडकावत आहे. कायद्यात बदल होऊ शकतात. मात्र, कायदाच मागे घेण्याची मागणी शेतकरी नेते करीत आहे. ही मागणी असंवैधानिक आणि लोकशाही विरोधी आहे. प्रथमच अशा प्रकारची मागणी होत असल्याचे आठवले म्हणाले.

नामांतरासाठी आम्ही सतरा वर्षे आंदोलन केले. मात्र, अशी अडवणुुकीची भूमिका घेतली नाही. लोकांना त्रास होईल असे वागलो नाही. दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलनावरुन जे सुरु आहे, त्याला जबाबदार कोण असा सवालही आठवले यांनी उपस्थित केला.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (ए) महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस चंद्रकांता कांबळे, परशूराम वाडेकर, सूर्यकांत वाघमारे या वेळी उपस्थित होते.---------------

आंदोलनजीवी नव्हे, शेतकऱ्यांना भडकवणारेभूमीहीन कुटुंबांसाठी आठवले यांनी आंदोलन जाहीर केले. मात्र, पंतप्रधान आंदोलनजीवी म्हणून शेतकरी आंदोलनाला संबोधत असल्याची आठवण पत्रकारांनी करुन दिल्यावर आठवले म्हणाले, त्यांना शेतकरी आंदलकांना भडकवणाऱ्या लोकांबाबत बोलायचे होते.---मराठ्यांसह देशातील क्षत्रिय, सवर्णांच्या आरक्षणास पाठिंबामराठा, राजपूत, जाट, ठाकूर, ब्राम्हण अशा सर्वच क्षत्रिय आणि सवर्णांना आरक्षण मिळाले पाहिजे. ज्यांचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांच्या खाली असेल त्यांना आरक्षण दिले जावे. नोकरी, शिक्षणात दहा ते बारा टक्के वाटा द्यावा. त्यांच्या आरक्षणाचा भार ओबीसींवर टाकू नये, असे आठवले म्हणाले.---येत्या २५ फेब्रुवारीपासून भूमीमुक्ती आंदोलनदेशात २५ फेब्रुवारीपासून भूमीमुक्ती आंदोलन सुरु करण्यात येईल. ज्या कुटुंबाकडे जमीन नाही, त्यांना पाच एकर भूखंड द्यावा अशी भूमिका आहे. देशात २० कोटी एकर पड जमीन आहे. त्याचा फायदा तीस ते पस्तीस कोटी लोकसंख्येला होईल.---जातीनिहाय जनगणना व्हावीदेशात होणार असलेली जनगणना जातीच्या आधारावर केली जावी. त्यामुळे प्रत्येक जातीचे प्रतिनिधित्व कळेल. सध्या शेड्युल्ड कास्ट आणि ट्राईब (एससी-एसटी) यांचे लोकसंख्येतील प्रमाण आहे.

टॅग्स :PuneपुणेFarmer strikeशेतकरी संपRamdas Athawaleरामदास आठवलेFarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकार