प्रसारणासाठी पैशांची मागणी

By Admin | Updated: March 13, 2015 06:00 IST2015-03-13T03:58:33+5:302015-03-13T06:00:41+5:30

घुमान येथे होणाऱ्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे प्रसारण आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून मोफत व्हावे याकरिता संमेलनाचे स्वागताध्यक्ष

Demand for money for the broadcast | प्रसारणासाठी पैशांची मागणी

प्रसारणासाठी पैशांची मागणी

मुंबई : घुमान येथे होणाऱ्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे प्रसारण आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून मोफत व्हावे याकरिता संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला यांनी प्रस्ताव पाठवला होता. परंतु या प्रसारणासाठी दूरदर्शनने ५ लाख रुपये तर आकाशवाणीनेही पैशाची मागणी केल्याची माहिती अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य यांनी दिली.
८८व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला पंजाब सरकारचा पूर्ण पाठिंबा आहे. संमेलनासाठी येणाऱ्या सर्व साहित्यप्रेमींच्या राहण्याचा आणि जेवणाचा खर्च पंजाब सरकारतर्फे करण्यात येणार आहे. घुमान येथील साहित्य संमेलन देशातील सर्व खेड्यांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने आम्ही आकाशवाणी आणि दूरदर्शनकडे ही मागणी केल्याचे वैद्य यांनी सांगितले. साहित्य नगरीस संत श्रेष्ठ नामदेव नगरी, व्यासपीठास लाल-बाल-पाल व्यासपीठ नाव देण्यात आले आहे. दोन्ही व्यासपीठांस श्री गोविंद सिंह आणि काकासाहेब गाडगीळ आदींची नावे दिली आहेत. भव्य सभामंडपाचे नाव श्री गुरूनानक देवजी असे ठेवले आहे. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे यांना संमेलनास उपस्थित राहण्यासाठी पत्र पाठविण्यात आले आहे; परंतु अद्यापही त्यांचे उत्तर आले नसल्याचे वैद्य यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Demand for money for the broadcast