शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

बॉम्बस्फोट पीडितांच्या नुकसानभरपाईसाठी धोरण निश्चित करा -न्यायालय

By admin | Updated: August 14, 2014 03:31 IST

बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातलगांना व यात जखमी झालेल्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी केंद्र शासनाने धोरण निश्चित करावे,

मुंबई : बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातलगांना व यात जखमी झालेल्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी केंद्र शासनाने धोरण निश्चित करावे, असे आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी दिले़महत्त्वाचे म्हणजे या नुकसानभरपाईची काही रक्कम बँकेत जमा करून त्याचे व्याज दरमहा देता येईल का किंवा मोटार अपघात कायद्यानुसार देण्यात येणाऱ्या भरपाईप्रमाणे याची बेरीज करता येईल का, या सर्व बाबींचा विचार करून हे धोरण निश्चित करावे, असेही न्या़ अभय ओक यांच्या खंडपीठाने आदेशात नमूद केले आहे़ मोटार अपघात कायद्यानुसार पीडित व्यक्तीच्या समाजातील स्थानाचाही विचार केला जातो़ केंद्र शासनाला ३१ आॅक्टोबरपर्यंत हे धोरण निश्चित करायचे आहे़ याप्रकरणी अ‍ॅड़ रामेश्वर पांचाळ यांनी जनहित याचिका दाखल केली आहे़ प्रत्येक नागरिकाला सुरक्षा देण्याची जबाबदारी सरकारची आहे़ मात्र देशभरात आजपर्यंत झालेल्या बॉम्बस्फोटांतील सर्वच पीडितांना याची नुकसानभरपाई मिळालेली नाही़ त्यामुळे ही नुकसानभरपाई देण्यासाठी कायमस्वरूपी धोरण निश्चित करण्याचे आदेश न्यायालयाने केंद्र शासनाला द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे़या मुद्द्यावर न्यायालयाला मदत करण्यासाठी खंडपीठाने अ‍ॅड़ सुदीप नारगोळकर यांची अ‍ॅमक्यस क्युरी म्हणून नियुक्ती केली आहे़ त्यांनी ही नुकसानभरपाई म्हणजे मदत नसून तो नागरिकांचा अधिकार असल्याचा युक्तिवाद केला़ ते म्हणाले, मुळात या नुकसानभरपाईची रक्कम बँकेत ठेवून त्याचे व्याज पीडितांना दिले पाहिजे़ याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटेल़ मात्र हा विषय केंद्र सरकारच्या अधिकार क्षेत्रात असल्याने ही याचिकाच केंद्रीय मंत्रिमंडळासमोर ठेवली जाणार असल्याचे केंद्र शासनाने न्यायालयात स्पष्ट केले़ त्यावर ही याचिका केंद्रीय मंत्रिमंडळासमोर ठेवली जात असली तरी आम्ही यासाठी योग्य ते आदेश देऊ म्हणजे हा विषय मंत्रिमंडळाच्या लक्षात येईल, असे नमूद करीत न्यायालयाने वरील आदेश दिले व ही सुनावणी ५ नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली़ (प्रतिनिधी)