अशोक डोंबाळेसांगली : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंख्येत झालेली मोठी घट आता थेट राजकीय समीकरणांवर परिणाम करताना दिसत आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत पदवीधर मतदारसंघात तब्बल एक लाख १५ हजार मतदार कमी झाले असून, शिक्षक मतदारसंघातही २० हजारांहून अधिक घट झाली आहे. यामुळे यंदाच्या निवडणुकीत चुरस कमी होऊन ‘मर्यादित लढती’चे चित्र दिसत आहे. डिसेंबर २०२६ मध्ये मतदान होण्याची शक्यता आहे.२०२० च्या निवडणुकीत पुणे पदवीधर मतदारसंघात तब्बल ६२ इच्छुक रिंगणात होते, तर शिक्षक मतदारसंघातही डझनभर इच्छुक उमेदवार होते. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे पदवीधरमधून आमदार अरुण लाड आणि शिक्षक मतदारसंघातून आमदार जयंत आसगावकर यांनी विजय मिळवला होता. महायुतीच्या उमेदवारांचा दोन्ही जागांवर पराभव झाला होता. मात्र यंदा सर्वच पक्षांमधील इच्छुकांची संख्या कमी झाल्याने मतदार नोंदणीवरही त्याचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातील आगामी निवडणुकीसाठी महायुतीकडून क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड, कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक भय्या माने, भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे आणि महाआघाडीकडून माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या कन्या हर्षदा देशमुख इच्छुक असल्याची चर्चा आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत इच्छुकांची संख्या कमी असल्याचा मतदार नोंदणीवर परिणाम झाल्याचे दिसत आहे.राज्य निवडणूक आयोगाने दि. १३ जानेवारी २०२६ रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली आहे. त्यानुसार पुणे पदवीधर मतदारसंघात सध्या तीन लाख १०,९६४ मतदार आहेत, जे २०२० मध्ये चार लाख २६ हजार २५७ होते. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ७५ हजार ४९८ मतदारांनी घट झाली असून, कोल्हापूर जिल्ह्यात मात्र २ हजार १६७ मतदार वाढले आहेत.शिक्षक मतदारसंघातही अशीच परिस्थिती आहे. २०२० मध्ये ७२ हजार ५४५ असलेली मतदारसंख्या आता ५१ हजार ९७९ वर आली आहे. पुणे, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांत घट झाली असताना सांगली जिल्ह्यात ५१० मतदारांनी वाढ झाली आहे. सध्या मतदार नोंदणी सुरू असली तरी इच्छुकांची कमी संख्या पाहता मोठी वाढ होण्याची शक्यता कमी असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. आमदारांचा कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये संपत असल्याने डिसेंबर २०२६ मध्ये निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
२०२० पुणे पदवीधर मतदारजिल्हा / मतदार २०२० / मतदार २०२६
- पुणे / १,३६,६११ / ६,१,११३
- सातारा / ५९,०७१ / ४२,०६३
- सांगली / ८७,२३३ / ७८,३६६
- कोल्हापूर / ८९,५२९ / ९१,४००
- सोलापूर / ५३,८१३ / ३८,०२२
- एकूण / ४,२६,२५७ / ३,१०,९६४
पुणे शिक्षक मतदारसंख्याजिल्हा / मतदार २०२० / मतदार २०२६
- पुणे / ३२,२०१ / १२,१८७
- सातारा / ७,७११ / ९,०९७
- सांगली / ६,८१२ / ७,३२२
- कोल्हापूर / १२,२३७ / १०,२१५
- सोलापूर / १३,५८४ / १३,१५८
- एकूण / ७२,५४५ / ५१,९७९
Web Summary : Pune's graduate constituency sees a massive voter decrease of 1.15 lakh, teachers' constituency declines by 20,000. Limited competition is expected in the upcoming December 2026 elections. Voter registration impacted by fewer candidates from Mahayuti and Maha Vikas Aghadi. Election Commission data reveals significant voter drops across districts.
Web Summary : पुणे के स्नातक निर्वाचन क्षेत्र में 1.15 लाख मतदाताओं की भारी गिरावट, शिक्षक निर्वाचन क्षेत्र में 20,000 की गिरावट। आगामी दिसंबर 2026 के चुनावों में सीमित प्रतिस्पर्धा की उम्मीद है। महायुति और महा विकास अघाड़ी के कम उम्मीदवारों से मतदाता पंजीकरण प्रभावित। चुनाव आयोग के आंकड़ों से जिलों में मतदाताओं की महत्वपूर्ण गिरावट का पता चलता है।