राज्यात तत्काळ दुष्काळ जाहीर करा, जयंत पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 01:27 IST2023-08-31T01:27:11+5:302023-08-31T01:27:30+5:30

राज्य सरकारने  या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्यात तत्काळ दुष्काळ जाहीर करून त्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना जाहीर कराव्यात,  अशी मागणी त्यांनी केली आहे. 

Declare immediate drought in the state, Jayant Patil's letter to Chief Minister | राज्यात तत्काळ दुष्काळ जाहीर करा, जयंत पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्यात तत्काळ दुष्काळ जाहीर करा, जयंत पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : राज्यात पावसाने दडी मारल्याने राज्यासमोर दुष्काळाचे संकट ओढवले आहे. तसे  घडल्यास राज्यात  शेतकरी आत्महत्येसारखे संकट गडद  होण्याची भीती राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. राज्य सरकारने  या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्यात तत्काळ दुष्काळ जाहीर करून त्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना जाहीर कराव्यात,  अशी मागणी त्यांनी केली आहे. 
जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात राज्यातील दुष्काळाची सद्य:स्थिती नमूद करून पुरेसा पाऊस न झाल्यास परिस्थिती कशी भीषण होऊ शकते, हे नमूद केले आहे.

Web Title: Declare immediate drought in the state, Jayant Patil's letter to Chief Minister