आप्पापाडा-पोयसर नदी विकास रस्ता 'व्हायटल प्रोजेक्ट' म्हणून घोषित करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 17:57 IST2025-10-21T17:56:16+5:302025-10-21T17:57:22+5:30
मुंबई-दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील आप्पापाडा- पोयसर नदी दरम्यानचा विकास रस्ता ‘व्हायटल प्रोजेक्ट’ म्हणून घोषित करा, अशी मागणी आमदार सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

आप्पापाडा-पोयसर नदी विकास रस्ता 'व्हायटल प्रोजेक्ट' म्हणून घोषित करण्याची मागणी
मुंबई-दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील आप्पापाडा- पोयसर नदी दरम्यानचा विकास रस्ता ‘व्हायटल प्रोजेक्ट’ म्हणून घोषित करा, अशी मागणी उद्धव सेनेचे नेते आणि आमदार सुनील प्रभू यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे.
दिंडोशी येथील आप्पापाडा परिसरात अरुंद रस्त्यांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असून, नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या समस्येवर तोडगा म्हणून पश्चिम द्रुतगती महामार्गाला समांतर जाणारा १३.४ मीटर रुंदीचा विकास आराखड्यातील रस्ता ( डीपी रोड ) तात्काळ प्रत्यक्षात आणणे गरजेचे आहे अशी मागणी त्यांनी केली.
या प्रस्तावित रस्त्यामुळेआप्पापाडा, गोकुळनगर परिसरात सुरू असलेल्या पोयसर नदी पुनरुज्जीवन प्रकल्पास चालना मिळेल.सांडपाणी प्रक्रिया संयंत्र (एसटीपी) आणि संबंधित पायाभूत सुविधा (इंटरसेप्टर, मलनिस्सारण वाहिन्या) यांची कामे वेळेत पूर्ण होऊ शकतील.स्थानिक वाहतूक कोंडी कमी होईल व नागरी जीवनमानात सुधारणा होईल.आत्तापर्यंत हा रस्ता केवळ आराखड्यात असून प्रत्यक्ष काम सुरु झालेले नाही अशी माहिती त्यांनी मुख्यमंत्र्यांनी दिली.त्यामुळे जेणेकरून संबंधित प्रकल्पांना अधिकृत मंजुरी व निधी मिळू शकेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.