जागांसंदर्भातील निर्णय 27 ऑगस्टर्पयत - मेटे

By Admin | Updated: August 20, 2014 00:46 IST2014-08-20T00:46:16+5:302014-08-20T00:46:16+5:30

आगामी विधानसभा निवडणुकीत काही जागा शिवसंग्राम पक्षाला मिळाव्यात असा प्रस्ताव आपण महायुतीच्या घटक पक्षातील प्रमुखांसमोर ठेवला आहे.

Decision regarding jaggery till 27th August - Mete | जागांसंदर्भातील निर्णय 27 ऑगस्टर्पयत - मेटे

जागांसंदर्भातील निर्णय 27 ऑगस्टर्पयत - मेटे

अमरावती : आगामी विधानसभा निवडणुकीत काही जागा शिवसंग्राम पक्षाला मिळाव्यात असा प्रस्ताव आपण महायुतीच्या घटक पक्षातील प्रमुखांसमोर ठेवला आहे. यावर बोलणी सुरू असून, 25 किंवा 27 ऑगस्टर्पयत जागांसंदर्भातील अंतिम बोलणी होणार आहे, अशी माहिती शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आ. विनायक मेटे यांनी मंगळवारी येथे दिली़ 
महाराष्ट्र राज्य सरपंच संघटना व शिवसंग्राम संघटनेच्या संयुक्त मेळाव्याच्या  उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मेटे म्हणाले, महाराष्ट्रात वीज, रस्ते व पाण्याची समस्या कायम आहे. राज्यावर 3 लाख हजार कोटींचे कर्ज आहे. दुष्काळात महाराष्ट्र होरपळतो आहे. शेतक:यांवर दुबार, तिबार पेरणीचे संकट ओढवले आहे. 

 

Web Title: Decision regarding jaggery till 27th August - Mete