शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
3
Top Marathi News LIVE Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यूएईमध्ये; इंधनाचे दर, तुटवडा यावरील चर्चा महत्त्वाची
4
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
5
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
6
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
7
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
8
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
9
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
10
Maharashtra Farmer: सहा मोठ्या धरणांतील गाळ शेतकऱ्यांना देणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय 
11
शनी जयंती २०२६: तुम्हाला माहीत आहे का? शनी जयंतीला पिंपळाखाली 'कणकेचाच दिवा' का लावतात?
12
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
13
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
14
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
16
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
17
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
18
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
19
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
20
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

उष्माघाताने बिबट्याचा मृत्यू!

By admin | Updated: May 6, 2016 01:27 IST

सवादेतील घटना : कोरड्या तलावानजीक बछडामृतावस्थेत आढळला

उंडाळे : कऱ्हाड तालुक्यातील सवादे येथील ‘बेलदरा’ नावाच्या शिवारात गुरुवारी सकाळी चार महिन्यांचा बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. उष्माघाताने संबंधित बिबट्याचा मृत्यू झाल्याची शक्यता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. कोरड्या पाझर तलावापासून काही अंतरावर पंचनाम्याचे सोपस्कार उरकल्यानंतर सायंकाळी बिबट्याचा मृतदेह कऱ्हाडला शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील म्हासोली, उंडाळे, बांदेकरवाडी व सवादे परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचा वावर आहे. या गावानजीक डोंगररांगा आहेत. तसेच अनेकांचे शेतशिवारेही या परिसरात आहेत. त्यामुळे शिवारात गेलेल्या ग्रामस्थांना अनेकवेळा बिबट्याचे दर्शन झाले आहे. तसेच बांदेकरवाडीत काही महिन्यांपूर्वी बिबट्याने चालत्या जीपवर झेप घेतली होती. या प्रकारांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. अशातच गुरुवारी सकाळी सवादे हद्दीत बिबट्याचा चार महिन्यांचा बछडा मृतावस्थेत आढळून आला.
सवादेत डोंगररांगांनजीक पाझर तलाव असून, या तलावापासून काही अंतरावर ‘बेलदरा’ नावाचे शिवार तसेच पाण्याची टाकी आहे. काही ग्रामस्थ गुरुवारी सकाळी शिवारात गेले होते. त्यावेळी भगवान जाधव यांच्या मालकीच्या मोकळ्या शिवारात बिबट्या मृतावस्थेत पडल्याचे आढळून आले.
ग्रामस्थांनी ही माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर वनपाल आर. डी. माळी, संतोष जाधवर यांच्यासह
अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले.
त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मुसळे यांना घटनास्थळी बोलावून घेतले.
डॉ. मुसळे यांनी मृत बिबट्याची पाहणी केली. त्यानंतर बिबट्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून देण्यात आला.

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत बिबट्याची पाहणी केली. त्यावेळी त्याच्या तोंडातून फेस आला असल्याचे निदर्शनास आले. तसेच मृत्युपूर्वी त्याने उलट्या केल्याचेही दिसून येत होते.
त्यामुळे उष्माघाताने त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. संबंधित बिबट्या मादी जातीचा असून, तो सुमारे चार महिन्यांचा आहे.