Death of father-son drowned in water; Incident in Malwadi village in Karmala taluka | पाण्यात बुडून बाप-लेकाचा मृत्यू; करमाळा तालुक्यातील मलवडी गावातील घटना
पाण्यात बुडून बाप-लेकाचा मृत्यू; करमाळा तालुक्यातील मलवडी गावातील घटना

ठळक मुद्दे- करमाळा तालुक्यातील मलवडी येथील घटना- घटनेची माहिती मिळताच करमाळा पोलीस घटनास्थळी दाखल- बाप-लेकाच्या मृत्यूने मलवडी गावावर पसरली शोककळा

करमाळा : विहिरीत पाय घसरून पडलेल्या मुलाला वाचविण्यासाठी गेलेल्या वडिलांचा मृत्यू झाला. या घटनेत मुलगा व वडिल दोघेही मयत झाल्याची घटना करमाळा तालुक्यातील मलवडी येथे सकाळी दहाच्या सुमारास घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मलवडी (ता.करमाळा) येथे इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेत असलेला सार्थक उर्फ सोन्या शिवाजी कोंडलकर (वय १३) आज सकाळी नऊ वाजता वस्तीसमोर असलेल्या विहीरीत पाय घसरून पडला. सार्थक ला पोहता येत नव्हते. पाण्यात बुडत असताना सार्थने आरडाओरडा करण्यास सुरू केली. हा आवाज ऐकून वडिल शिवाजी भिमराव कोंडलकर (वय ३५) हे धावत विहिरीजवळ आले़ मुलगा पाण्यात बुडत असतानाचे पाहत त्याला वाचविण्यासाठी वडिल शिवाजी यांनी विहिरीतील पाण्यात उडी मारली. त्याला पाण्यातून वाचवून बाहेर काढत असताना सार्थकने पाण्याच्या भितीने वडिलांना मिठी मारली. यामुळे दोघेही बाप-लेक विहिरीतील पाण्यात बुडाले़ दुदैवाने दोघांचाही बुडून मृत्यू झाला.

 या घटनेनंतर मयत बापलेकाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यासाठी विहिरीवर मोठया प्रमाणात पंप लावण्यात आले आहे़ विहिरीतील पाणी काढण्याचे काम वेगाने सुरू आहे़ घटनेची माहिती मिळताच करमाळा पोलीसांनी घटनास्थळला धाव घेतली आहे.

Web Title: Death of father-son drowned in water; Incident in Malwadi village in Karmala taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.