शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

बंडखोरांच्या विरोधामुळे अस्वस्थ 'भरणेमामां' ची निवडणूक रिंगणातुन माघार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 18:14 IST

इंदापुरच्या राजकारणात खळबळ... 

ठळक मुद्देउमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे दोन दिवस उरले असताना भरणे यांचा निर्णय

इंदापुर : इंदापुर तालुक्यात राष्ट्रवादी काँंग्रेसमधील बंडखोर गटाने आमदार दत्तात्रय भरणे यांच्या विधानसभेच्या उमेदवारीला सातत्याने विरोध कायम ठेवला आहे. विरोधामुळे अस्वस्थ झालेले  इंदापुर चे आमदार  दत्तात्रय भरणे यांनी आपण इंदापूर विधानसभेची निवडणूक लढविणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे.याबाबत आमदार भरणे यांनी कार्यकर्त्यांना संदेश दिल्यानंतर तालुक्यात खळबळ उडाली आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे दोन दिवस उरले असताना भरणे यांनी हा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भांबावुन गेले आहेत. आघाडीमध्ये उमेदवारी मिळविण्यासाठी आमदार भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यात जोरदार रस्सीखेच होती. याच दरम्यान आघाडीकडुन विधानसभेसाठी डावलले जाण्याच्या भीतीमधुन माजी मंत्री पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. शिवसेनेकडे असणारा हा पारंपारिक मतदार संघ भाजपकडे घेवुन पाटील यांना भाजपची उमेदवारी जाहिर केली आहे.त्यानंतर भाजप चे ठरले,राष्ट्रवादीचे कधी ठरणार,याबाबत राजकीय चर्चा रंगल्या होत्या.याच दरम्यान विधानसभा निवडणुक लढविण्याबाबत भरणे यांचा 'नकारबाँब' पडल्याने खळबळ उडाली आहे.  भरणे यांच्या नकारारात्मक  भुमिकेमागे राष्ट्रवादीचा बंडखोरांचा गट असल्याचे मानले जाते. कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेग जगदाळे यांच्यासह ७ जण आमदारकीसाठी इच्छुक आहेत.त्यामुळे या सातजणांनी भरणे यांच्या उमेदवारीला विरोध करण्याची भुमिका घेतली होती.याबाबत संबंधितांनी मेळावे घेत भरणे यांच्या उमेदवारीला विरोध करण्याचे सत्र सुरुच ठेवले.त्यामुळे अस्वस्थ झालेल्या भरणे यांनी आता विधानसभेच्या रिंगणातुन माघार घेण्याची भूमिका घेतली आहे.दरम्यान,भरणे समर्थकांनी त्यांच्या भूमिकेला विरोध दर्शवित त्यांच्या निवासस्थानी ठिय्या  देण्याचा निर्धार केला आहे. भरणे यांचे मन वळवत त्यांचा होकार मिळविण्यासाठी इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आमदार  भरणे  समर्थक त्यांच्या अंथुर्ण भरणेवाडी येथील निवासस्थानी गुरुवारी(दि ३) एकत्रित येणार आहेत.याबाबत सोशल मीडियावर संदेश व्हायरल करण्यात आले आहेत.————————————————

टॅग्स :Indapurइंदापूरvidhan sabhaविधानसभाNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाElectionनिवडणूकAjit Pawarअजित पवार