शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

दत्ता मेघे भाजपाच्या वाटेवर!

By admin | Updated: June 1, 2014 00:27 IST

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये विविध जबाबदा:या पार पाडल्यानंतर आता माजी खा. दत्ता मेघे हे भाजपावासी होण्याच्या मार्गावर आहेत.

कमलेश वानखेडे - नागपूर
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये विविध जबाबदा:या पार पाडल्यानंतर आता माजी खा. दत्ता मेघे हे भाजपावासी होण्याच्या मार्गावर आहेत. भाजपाचे राष्ट्रीय नेते व केंद्रीय परिवहन आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांना ‘मैत्री’चा हात देणार अहेत.  गडकरी-मेघे यांची रविवारी बैठक होणार असून, त्यात मेघेंच्या भाजपा प्रवेशावर शिक्कामोर्तब होईल व दोन दिवसांत तशी रितसर घोषणा होईल,  अशी विश्वसनीय माहिती भाजपाच्या गोटातील सूत्रंनी दिली आहे. याबाबत मेघे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. 
लोकसभा निवडणुकीत मेघे यांचे पुत्र सागर यांनी वर्धेतून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविली. त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. या निवडणुकीपूर्वी मेघे यांनी भाजपामध्ये येऊन सागर यांना वर्धेत भाजपाकडून लढवावे, असा गडकरींचा आग्रह होता. पक्षाच्या संसदीय मंडळात गडकरींनी आपले वजन वापरून वर्धेचा निर्णय थांबवून ठेवला होता. दत्ता मेघेही त्यासाठी तयार होते. मात्र, ‘बाबां’च्या प्रेमात सागर यांनी काँग्रेसकडून लढण्याला अधिक पसंती दर्शविली. मात्र, या निवडणुकीत सागर यांचा दारूण पराभव झाला़ अशात पुन्हा एकदा गडकरीत दडलेल्या त्यांच्या मित्रने त्यांच्यासाठी  मदतीचा हात पुढे केला आहे. सागर यापूर्वी भाजपाकडून विधान परिषदेत निवडून गेले होते. त्यावेळीही गडकरींनीच त्यांना मदत केली होती. मात्र, मध्येच सागर यांनी आमदारकीचा राजीनामा देत भाजपाला रामराम केला. हा प्रकार गडकरींसह भाजपामधील अनेकांना खटकला होता. आता वर्धेतील पराभवानंतर दत्ताभाऊ भाजपावासी होणार असल्याच्या चर्चेमुळे भाजपामध्ये दबक्या आवाजात जुना इतिहास चर्चिला जात आहे. 
 दत्ता मेघे यांनी पवार यांच्यासोबत काँग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला. नंतरच्या काळात त्यांनी राष्ट्रवादीचे ‘घडय़ाळ’ सोडत पुन्हा काँग्रेसचा मार्ग धरला. वर्धेतून लोकसभा लढले व खासदार झाले. दत्ता मेघे यांनी राष्ट्रवादी सोडली तेव्हाच त्यांचे भाजपा प्रवेशाचे ठरले होते. राज्यसभाही निश्चित झाली होती. मात्र, त्यावेळी शरद पवार यांनी लालकृष्ण अडवाणींना फोन करून तासाभरात खेळ केला व तिकीट कापले, असे राजकीय सूत्रंकडून सांगितले जाते. तेव्हा जे हुकले ते आता साध्य होण्याची शक्यता आहे. तसे झाले तर गडकरी- मेघे यांच्या राजकीय मैत्रीचे नवे पर्व सुरू झाल्याचे पहायला मिळेल.