शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
2
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
3
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
4
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
5
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
6
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
7
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
8
हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 
9
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
10
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
11
"...तर चंद्राबाबू नायडूंना पाठिंबा देऊ"; लोकसभा अध्यक्षपदाबाबत संजय राऊतांचे विधान
12
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
14
सारांश : विकासाचे मार्ग आता प्रशस्त होण्याची अपेक्षा!
15
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
16
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
17
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
18
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
19
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
20
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा

अकोल्यात कोविडच्या नव्या स्ट्रेनचा धोका! ७५ नमुने तपासणीसाठी पाठविले पुण्याला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 1:35 AM

CoronaVirus : फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील मूर्तिजापूर, अकोटसह महापालिका क्षेत्रातील काही भागात कोरोनाचे नवे हाॅटस्पॉट निर्माण होऊ लागले होते.

अकोला : कोरोना संसर्गाच्या फैलावाचा वेग पाहता जिल्ह्यात कोरोनाच्या नव्या म्युटेट स्ट्रेनचा धोका वर्तविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने खबरदारी घेत आरोग्य विभागातर्फे ७५ नमुने तपासणीसाठी पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरालॉजीकडे (एनआयव्ही) पाठविण्यात आल्याची माहिती आहे. नमुन्यांचे तपासणी अहवाल येत्या दोन ते तीन दिवसात प्राप्त होणार आहेत. त्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील मूर्तिजापूर, अकोटसह महापालिका क्षेत्रातील काही भागात कोरोनाचे नवे हाॅटस्पॉट निर्माण होऊ लागले होते. गत आठवडाभरात रुग्णवाढीचा वेग झपाट्याने वाढला. शेजारच्या अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातदेखील कोराेनाचा कहर सुरूच आहे. दरम्यान, अमरावती येथे कोरोनाचा नवा म्युटेट स्ट्रेन असल्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने येथील काही कोविड रुग्णांचे नमुने वैद्यकीय चाचणीसाठी एनआयव्हीकडे पाठविण्यात आले होते. या पाश्वभूमीवर अकोला आरोग्य विभागातर्फे गुरुवारी रात्री ७५ कोविड रुग्णांचे नमुने पाठविण्यात आले.

कोविड संसर्गात हा आहे बदल- पूर्वीचा कोरोना- कोविड रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला चार ते पाच दिवसानंतर लक्षणे दिसायची- सर्दी, कोरडा खोकला, धाप लागणे.- ताप येणे, ऑक्सिजनची पातळी कमी होणे.- संसर्गाचा वेग कमी- म्युटेट स्ट्रेन- कोविड रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला २४ तासांतच लक्षणे दिसायला लागतात.- सर्दी, कोरडा खोकला, धाप लागणे, ताप येणे, ऑक्सिजनची पातळी कमी होणे.

संसर्गाचा वेग जास्तजिल्ह्यात कोरोनाच्या फैलावाची गती लक्षात घेता नव्या स्ट्रेनचा धोका नाकारता येत नाही. खबरदारी म्हणून ७५ नमुने तपासणीसाठी पुणे येथील एनआयव्हीकडे पाठविण्यात आलेत.- डॉ. सुरेश आसोले,जिल्हा आरोग्य अधिकारी, अकोला

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAkolaअकोला