सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान; राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 09:17 IST2025-03-30T09:14:43+5:302025-03-30T09:17:58+5:30

Raj Thackeray News: मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्या. विभा कंकणवाडी आणि न्या. संजय देशमुख यांनी राज ठाकरे  यांच्याविरुद्ध ‘सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याबाबत’ दाखल गुन्हा आणि परळीच्या न्यायालयातील दोषारोपपत्र रद्द करून त्यांची निर्दोष सुटका केली.

Damage to public property; Raj Thackeray acquitted | सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान; राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता

सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान; राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता

 छत्रपती संभाजीनगर - मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्या. विभा कंकणवाडी आणि न्या. संजय देशमुख यांनी राज ठाकरे  यांच्याविरुद्ध ‘सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याबाबत’ दाखल गुन्हा आणि परळीच्या न्यायालयातील दोषारोपपत्र रद्द करून त्यांची निर्दोष सुटका केली. घटनेवेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे घटनास्थळी हजर होते किंवा त्यांनी बसवर दगडफेक केल्याचा पुरावा नसल्यानचे न्यायलयाने म्हटले आहे.

काय होती घटना ?
२००८ साली राज ठाकरे यांच्या अटकेनंतर उसळलेल्या दंगलीत परळी-गंगाखेड मार्गावर २२ ऑक्टोबर २००८ रोजी अज्ञात लोक एसटी बस थांबवून ‘राज ठाकरे जिंदाबाद’ अशा घोषणा देत बसवर दगडफेक करून निघून गेले.
ही घटना राज ठाकरे यांच्या चिथावणीखोर भाषणामुळे घडली, असा निष्कर्ष काढत ठाकरे आणि इतरांविरुद्ध सार्वजनिक मालमत्तेला नुकसान पोहोचविल्याचा परळी वैजनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. 

Web Title: Damage to public property; Raj Thackeray acquitted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.