शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

राज्यात पुरामुळे २ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 7:00 AM

पश्चिम महाराष्ट्रात ओला दुष्काळाला सामोरा जात आहे. तर, मराठवाड्यात अजूनही सहाशे टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

पुणे : राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे १३ जिल्ह्यातील तब्बल २ लाख १ हजार ४९६ हेक्टरवर क्षेत्रावरील पिके बाधित झाली असून, कोल्हापूर आणि सांगलीला सर्वाधिक फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या फळबागांचे नुकसान झाले असल्यास त्यांना पांडुरंग फुंडकर फळबाग योजनेअंतर्गत बागांची पुनर्उभारणी करण्यासाठी शंभरटक्के अनुदान दिले जाईल, अशी माहिती फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. फलोत्पादन मंत्री क्षीरसागर यांनी विभागातील कामाकाजाचा आढावा घेण्यासाठी कृषी आयुक्तालयात बैठक बोलावली होती. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी काय उपाययोजना करणार याची माहिती दिली. कृषी आयुक्त सुहास दिवसे यावेळी उपस्थित होते. क्षीरसागर म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात ओला दुष्काळाला सामोरा जात आहे. तर, मराठवाड्यात अजूनही सहाशे टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. जायकवाडी धरणात ६५ टक्के पाणीसाठा झाला असला तरी, मांजरा आणि अन्य प्रकल्पात पाणी नाही. पश्चिम महाराष्ट्रात उपग्रहाद्वारे प्राप्त झालेल्या छायाचित्रा नुसार दोन लाखांहून अधिक शेती पाण्याखाली गेली आहे. फळबागांसह इतर पिकांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. फळबागांच्या नुकसानीसाठी सरकार संपूर्ण मदत देईल. खड्डे खोदण्यापासून ते रोपे देण्यापर्यंत संपूर्ण मदत शेतकऱ्यांना केली जाईल. याशिवाय मागेल त्याला शेततळे हे धोरण राबविण्यात येईल. आत्महत्याग्रस्त आणि नक्षलग्रस्त जिल्हे, कायम दुष्काळी तालुके आणि पश्चिम महाराष्ट्रातील ७७ तालुक्यांमधे ठिबक सिंचनासाठी ८० टक्के अनुदान दिले जाईल. कोकणामधे काजू विकास मंडळामार्फत काजू लागवडीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. तसेच, मराठवाड्यातील दुष्काळी स्थिती पाहता, रोजगारासाठी तेथून होणारे स्थलांतर रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. मागेल त्याला काम हे धोरण तेथे राबविण्यात येणार असल्याची माहिती क्षीरसागर यांनी दिली. 

--------------------------

पुरामुळे बाधित झालेल्या शेतीचा प्राथमिक अंदाज (क्षेत्र हेक्टरमधे)

जिल्हा                    बाधित क्षेत्र                पिके रायगड                     १७७५५.२०        भात, आंबा व भाजीपालाठाणे                         २१७५.०२               भातसिंधुदूर्ग                    ९७९४.२०               भात, भाजीपालापालघर                  ११४८४.३१            भात, चिकू, केळी, आंबा, नाचणी, वरईधुळे                      १२२३.६०                कापूस, ज्वारी, मूग, उडीद,सोयाबीन,मकानाशिक                  २२३३४.१०            भात, मूग, उडीद, कापूस, सोयाबीन, मका, बाजरी, तूर, वरई, नाचणी,                                                                          भाजीपालासातारा                २३११६.५३           सोयाबीन, भात, मूग, उडीद, मका, बाजरी, ऊस, ज्वारी, भाजीपालासांगली               २०५७१                 सोयाबीन, भुईमूग, केळी, हळद, भात, बाजरी, ऊस, ज्वारी, भाजीपालाकोल्हापूर             ६८६१०               भात, नाचणी, बाजरी, भुईमूग, सोयाबीन, ऊस, भाजीपालापुणे                     १२८९१                सोयाबीन, भात, भुईमूग, मका, भाजीपालासोलापूर             १०८२०.२०            ऊस, केळी, पेरु, नारळ, मका, मूग, उडीद, सोयाबीन, तूर, डाळींब, बाजरीअहमदनगर         ६४४                    सोयाबीन, बाजरी, मका, तूर, ऊसवर्धा                  ७७                        कापूस, सोयाबीन, तूर, भाजीपाला

 

टॅग्स :PuneपुणेagricultureशेतीRainपाऊसfloodपूरdroughtदुष्काळ