शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

धरण उशाला? मग सुविधा कशाला?

By admin | Updated: August 15, 2016 03:52 IST

शहरातील नागरिकांना सुविधा मिळाव्यात, यासाठी ग्रामीण भागातील गरीबांना नेहमीच लाथाडले जाते.

- पंकज पाटील,

बदलापूर/मुरबाड- शहरातील नागरिकांना सुविधा मिळाव्यात, यासाठी ग्रामीण भागातील गरीबांना नेहमीच लाथाडले जाते. त्यांना वाली नसतो, हे बारवी धरणाच्या उंची वाढविण्यावरुन पुन्हा एकदा सिद्ध झाले. ‘आधी पुनर्वसन नंतर धरण’ या घोषणा देऊन-तसे धोरण ठरवूनही बाधितांचे जेथे पुनर्वसन करायचे आहे तेथे प्राथमिक सुविधाही नाहीत. त्यामुळे कोयना धरणग्रस्तांपासून आजतागायत कितीही धरणे झाली-धोरणे झाली पण राजकारण्यांची आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची वृत्ती बदलायला तयार नाही. ज्यांची घरे गेली त्यांना सुविधा देऊन उपकार करतो आहोत, ही भावना असेल तर नेमके काय घडू शकते याचे बारवी धरणग्रस्त हे आणखी एक उदाहरण ठरावे. पुनर्वसनासाठी भरपूर काळ हाती असूनही धरणग्रस्तांची जी परवड सुरू आहे ती पाहता शेतकरी जमिनी देण्यास का तयार होत नाहीत, याचे उत्तर चुटकीसरशी मिळते.ठाणे जिल्ह्यातील निम्मी शहरे आणि एमआयडीसीला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणाची उंची वाढविण्यात आल्याने धरणाखाली जाणाऱ्या गावांत पाणी शिरू लागले आहे. त्यामुळे धरणाच्या पाण्याखाली जाणाऱ्या गावांच्या स्थलांतराच्या हालचाली सुरू झाल्या. नोकरीच्या आश्वासनावर, प्रसंगी रोख भरपाईवरही शिक्कामोर्तब झाल्याने सारे आलबेल असल्याचे चित्र निर्माण झाले. पावसाळा सुरू होण्याअगोदर एमआयडीसीचे अधिकरी पुनर्वसन कुठे, कसे केले जाईल, त्यासाठी यंत्रणा कशी जय्यत तयारीत आहे, याच्या पत्रकार परिषदा घेत असल्याने कोयना धरणापासून सुरू असलेली धरणग्रस्तांची परवड यावेळी होणार नाही, असा विश्वास सर्वांना वाटत होता. पाणी शिरणाऱ्या गावातील चित्र भयावह आहे. पुनर्वसनाचा निकाल लागेपर्यंत आदिवासी घरे सोडण्यास तयार नाहीत. त्याचवेळी मुरबाड तालुक्यात जेथे ग्रामस्थांचे पुनर्वसन होणार आहे, तेथील परिस्थिती भयावह आहे. आपले घर-दार, सर्वस्व सोडून देशोधडीला लागलेल्या कुटुंबासाठी साध्या-साध्या सुविधांचा विचारच झालेला नाही. पुनर्वसनाच्या श्रेयाचे फलक झळकत आहेत, पण ज्यांचे आयुष्य विस्कटून गेले आहे त्यांच्याकडे पाहण्याचा सरकारी यंत्रणांचा दृष्टीकोन तसाच आहे. बुडणाऱ्या गावांमधील परिस्थिती जशी विषण्ण करणारी आहे, तशीच पुनर्वसनाच्या ठिकाणची. या धरणात तिसऱ्यांदा बाधित होणाऱ्या या प्रकल्पग्रस्तांना कागदावरच्या सरकारी पॅकेजसोबत मूलभूत सुविधांची गरजही भासणार आहे, पण यंत्रणांच्या ते गावीही नाही.