शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

राज्यातील धरणे ६५ टक्केच : मराठवाडा-विदर्भ अजूनही तहानलेलाच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 12:58 IST

मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश तालुक्यात सरासरीच्या ५० ते ६० टक्केच पाऊस ऑगस्ट अखेरीस झाला आहे..

ठळक मुद्देकृष्णा-भीमा खोऱ्यातील धरणे भरलेली

पुणे : पश्चिम महाराष्ट्र वगळता मराठवाडा आणि विदभार्तील बहुतांश धरणात अजूनही पाण्याचा खडखडाट आहे. राज्यातील धरणांमधे १४४४ अब्ज घनफूट (टीएमसी) पाण्याची क्षमता असून, सोमवार (दि.२) अखेरीस त्यात ९३२.१४ टीएमसी (६४.५५ टक्के) पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी याच काळात ६५.३४ टक्के पाणीसाठा होता. कृष्णा आणि भीमा खोऱ्यातील धरणेच जलयुक्त झाली असून, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश धरणांत उपयुक्त साठा अत्यल्प आहे.जून महिन्यात मॉन्सून कोरडा गेल्यानंतर जुलैचा शेवटचा आणि ऑगस्ट महिन्यातील पहिल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाची धरणे भरली आहेत. कृष्णा आणि भीमा नदीच्या खोऱ्यातील कोयना, राधानगरी, वारणावती, दूधगंगा, भाटघर, नीरा देवघर, वीर, पानशेत, वरसगाव, मुळशी, पवना, डिंभे, चासकमान ही धरणे भरली आहेत. भीमा खोऱ्यातील धरणांमधून सोडलेल्या पाण्यामुळे राज्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या उजनीत ११७.४७ टीएमसी (१०० टक्के) पाणीसाठा झाला आहे. औरंगाबाद विभागाची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी (पैठण) धरणात गोदावरीतील पाणी जमा झाल्याने यंदा धरणात ९० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला होता. या धरणाची क्षमता १०५ टीएमसी असून, ७६.६५ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. सध्या या धरणा ६५.५६ टीएमसी उपयुक्तपाणीसाठा आहे. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर आणि भंडारा या जिल्ह्यांसाठी वरदायिनी ठरलेल्या वैनगंगेवरील गोसी खूर्द प्रकल्पात १६.२७ टीएमसी (६२.२७ टक्के) पाणीसाठा आहे.मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश तालुक्यात सरासरीच्या ५० ते ६० टक्केच पाऊस ऑगस्ट अखेरीस झाला आहे. अमरावती विभागात अवघा ५०.८२ टीएमसी (३४.३२ टक्के) पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी याच काळात येथे ५५.६७ टक्के पाणीसाठा होता. औरंगाबाद विभागामध्ये ७९.८० टीएमसी (३०.६६ टक्के) पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी तो २८ टक्के होता. नागपूर विभागामधे ८७.१९ टीएमसी (५३.६ टक्के) पाणीसाठा असून, गेल्यावर्षी तो ४९.८८ टक्के होता. या भागामधे यंदा देखील पाणीटंचाई जाणवेल अशीच स्थिती आहे. अमरावती विभागातील काटेपूण, इसापूर, अरुणावती आणि पूस धरणातील पाणीसाठा २० टक्के देखील नाही. औरंगाबाद विभागातील मांजरा, माजलगाव, येलदरी, सिद्धेश्वर, निम्न तेरणा, सिना कोळेगाव आणि निम्न दुधना प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा अजूनही शून्य आहे. नागपूर विभागातील बावनथडीमधे साडेपाच, दिना शून्य, खिडसी १७.२९ आणि तोतलाडोह ३८, कामठी खैरी २९.५९, निम्न वर्धा ४६, बोर धरणात ४२.३१ टक्के पाणीसाठा आहे.

टॅग्स :PuneपुणेDamधरणWaterपाणीRainपाऊसdroughtदुष्काळ