'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 14:38 IST2025-09-25T14:34:29+5:302025-09-25T14:38:00+5:30
Ajit Pawar Latest News: मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील पुरग्रस्त भागाची पाहणी करत असताना शेतकऱ्यांकडून कर्जमाफी करण्याची मागणी होत आहे. धाराशिव जिल्ह्यात एका शेतकऱ्यांने हा मुद्दा मांडला, त्यावर अजित पवारांना संताप अनावर झाला.

'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
Ajit Pawar Maharashtra Flood: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. शेतीचे अतोनात नुकसान झाले असून, शेतकऱ्यांकडून कर्जमाफी करण्याची मागणी केली जात आहे. परांडा तालुक्यात पुराचा फटका बसलेल्या गावाला भेट दिल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे एका शेतकऱ्यांने कर्जमाफीची मागणी केली. त्यावर ते संतापले. आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?, अशा शब्दात त्यांनी सुनावले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भूम परांडा मतदारसंघातील देवगाव खुर्द गावातील पूर परिस्थितीची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पाहणी केली. ग्रामस्थांशीही त्यांनी संवाद साधला. शेतकऱ्यांना, ग्रामस्थांना धीर दिला.
पूरग्रस्तांशी बोलताना काय घडलं?
'तुम्ही धीर सोडू नका, आम्ही सगळे तुमच्या पाठिंशी आहोत', असे म्हणत असतानाच एक शेतकरी म्हणाला, 'दादा, कर्जमाफी करा ना.' अजित पवार मागे बघत म्हणाले, 'याला करा रे मुख्यमंत्री.'
अजित पवार म्हणाले, जो काम करतो, त्याचीच मारा
त्यानंतर बोलताना अजित पवार म्हणाले, "आम्हाला कळतंय ना? आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय? भावा सकाळी सहा वाजता करमाळ्यापासून काम सुरू केलं. जे काम करतं ना त्याचीच मारा", अशा शब्दात अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली.
"एवढं जीव तोडून सांगतोय. अजून पण एका ठिकाणी जायचं आहे. आम्हालाही कळतंय ना. आम्ही लाडक्या बहिणींना किती मदत करतोय. आज ४५ हजार कोटी रुपये वर्षाला मदत करतोय. शेतकऱ्यांची वीज माफी केली, २० हजार कोटी रुपये भरतोय", असे अजित पवार म्हणाले.
आज भूम-परांडा मतदारसंघातील देवगाव खुर्द येथील पूरपरिस्थितीची जवळून पाहणी केली. गावात जाऊन गावकऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्या कुटुंबाची विचारपूस केली. शेतकऱ्यांची शेतं, नुकसानग्रस्त घरं आणि उध्वस्त झालेला संसार प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिला. यावेळी गावकऱ्यांना धीर देत आपलं सरकार शक्य… pic.twitter.com/MnDpFO06Ls
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) September 24, 2025
"इथे माझा कार्यकर्ता बसलाय. याने मला काल रात्री कॉल केला आणि म्हणाला की, दादा, इथे परांडा-भूममध्ये असं असं झालंय. पाणी आलंय. लोक घाबरून गेली आहेत. तिथून मी सूत्रं फिरवली. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. सगळी सोंग करतात येतात, पण पैशाचं सोंग करता येत नाही", असे सांगत अजित पवारांनी कर्जमाफी करण्याच्या मुद्द्याला पुन्हा बगल दिली.