राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 08:26 IST2025-10-04T08:22:08+5:302025-10-04T08:26:27+5:30
Cyclone Shakti:राज्यातील शेतकरी आधीच अतिवृष्टीने हैराण आहेत आणि त्यात आता नव्या संकटाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने ‘शक्ती’ चक्रीवादळाचा इशारा देत मुंबईसह कोकण किनारपट्टीसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.

राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
Cyclone Shakti : राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले असतानाच आता महाराष्ट्रावर आणखी एक संकट येत असल्याचा इशारा दिला आहे. भारतीय हवामान विभागाने ‘शक्ती’ चक्रीवादळाचा इशारा देत मुंबई, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग या किनारी जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला आहे.
४ ते ७ ऑक्टोबर दरम्यान या भागात मुसळधार पाऊस, वादळी वारे (४५-६५ किमी प्रतितास वेगाने) आणि समुद्रात प्रचंड लाटा येण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
मच्छिमारांना इशारा
आयएमडीनुसार, वाऱ्याचा वेग आणखी वाढू शकतो. यामुळे समुद्राच्या मोठ्या येऊ शकतात. मच्छिमारांना समुद्रापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हवामान खात्याने पूर्व विदर्भ आणि मराठवाडा प्रदेशांसह महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे.
सरकारने अलर्ट दिला
मुसळधार पावसामुळे किनारपट्टीच्या भागात पूर परिस्थिती येऊ शकते. विशेषतः कोकण किनारपट्टीवर वादळासह मुसळधार पाऊस आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ 'शक्ती'ला तोंड देण्यासाठी महाराष्ट्र सरकारनेही तयारी सुरू केली आहे.
महाराष्ट्र सरकारने सर्व जिल्ह्यांमधील मदत पथकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. लोकांना किनाऱ्यापासून दूर राहण्यास सांगण्यात आले आहे. किनाऱ्याजवळ राहणाऱ्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. पर्यटकांना समुद्राजवळ जाऊ नये असा सल्लाही देण्यात आला आहे.