Cyclone Nisarga : 'निसर्गा'च्या तडाख्यातून मुंबईसह महाराष्ट्राचे रक्षण; मुख्यमंत्र्यांनी जनतेसह सगळ्यांचे मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2020 10:52 PM2020-06-03T22:52:15+5:302020-06-03T22:52:35+5:30

Cyclone Nisarga : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक निवेदन प्रसिद्ध करून जनतेचे आभार मानले आहेत.

Cyclone Nisarga Protection of Mumbai and Maharashtra from the cyclone of 'nature'; The Chief Minister | Cyclone Nisarga : 'निसर्गा'च्या तडाख्यातून मुंबईसह महाराष्ट्राचे रक्षण; मुख्यमंत्र्यांनी जनतेसह सगळ्यांचे मानले आभार

Cyclone Nisarga : 'निसर्गा'च्या तडाख्यातून मुंबईसह महाराष्ट्राचे रक्षण; मुख्यमंत्र्यांनी जनतेसह सगळ्यांचे मानले आभार

googlenewsNext

मुंबईः निसर्ग चक्रीवादळाचा मुंबईला असलेला धोका टळला असल्याची माहिती स्कायमेटनं दिली आहे. चक्रीवादळ ईशान्येकडे सरकलं असून, निसर्ग चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली आहे. मुंबईच्या पूर्वेला महाराष्ट्रातल्या अंतर्गत भागात ९० किलोमीटर अंतरावर हे चक्रीवादळ शमलं. आता ते पुढे ईशान्येकडे सरकून येत्या ३ तासांत त्याचं कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर होणार असल्याचं हवामान विभागानं  सांगितलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक निवेदन प्रसिद्ध करून जनतेचे आभार मानले आहेत.

निवेदनात ते म्हणतात, महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट घोंघावत असतानाच चक्रीवादळाचा तडाखा बसला. संकट म्हटले तर मोठे होते. पण हे संकट आपण सगळ्यांनी परतवून लावले आहे. जनता व प्रशासनाने झुंज दिली व संकटाची तीव्रता कमी केली. दुर्दैवाने दोन जीव अपघातात गेले. कोकणात तसेच इतरत्र नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. मुंबा देवीचीच कृपा मुंबईवर आहे, तशी पंढरपूरच्या विठु माऊलींचे आशीर्वाद आहेत.

मुख्य म्हणजे या वादळाला थोपवून सामना करणारे महापालिका अधिकारी, जिल्हा प्रशासन, आपत्कालीन व्यवस्थापन, वैद्यकीय पथके या सगळ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. वृत्तवाहिन्यासुद्धा लोकांना चांगली माहिती देत होत्या. निसर्गापुढे कोणाचेही चालत नाही. पण संकट काळात महाराष्ट्र एक आहे. खंबीर आहे हे या वादळात दिसून आले. हीच आपली एकजूट महाराष्ट्राला सर्व संकटातून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. 

हेही वाचा

PoKमध्ये बौद्धांच्या वारशाला धक्का; गिलगिट-बाल्टिस्तान रिकामी करा; भारताचा पाकला कडक इशारा

Cyclone Nisarga: चक्रीवादळाने दिशा बदलल्याने मुंबई अन् ठाण्यातील मच्छीमारांसाठी धोका टळला

मोदींच्या मंत्रिमंडळानं घेतले ६ मोठे निर्णय, कोलकाता बंदराला दिलं श्यामा प्रसाद मुखर्जींचं नाव 

दिलासादायक! राज्यात ३२ हजार जणांची कोरोनातून मुक्तता; २५६० नवे रुग्ण सापडले

Cyclone Nisarga:निसर्ग चक्रीवादळाचा रेल्वेलाही फटका; एकही श्रमिक ट्रेन धावली नाही

गुजरातमध्ये केमिकल फॅक्टरीत स्फोट; पाच जणांचा मृत्यू, ३२ जखमी

Cyclone Nisarga: चक्रीवादळ अलिबागच्या किना-यावर धडकले; पुढचे २-३ तास महत्त्वाचे- बाळासाहेब थोरात 

मोदींच्या मंत्रिमंडळाची दोन अध्यादेशांना मंजुरी; शेतकऱ्यांसाठी 'एक देश एक बाजार' धोरण 

Web Title: Cyclone Nisarga Protection of Mumbai and Maharashtra from the cyclone of 'nature'; The Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.