Cyclone Nisarga also hit the railways; No labor train ran | Cyclone Nisarga:निसर्ग चक्रीवादळाचा रेल्वेलाही फटका; एकही श्रमिक ट्रेन धावली नाही

Cyclone Nisarga:निसर्ग चक्रीवादळाचा रेल्वेलाही फटका; एकही श्रमिक ट्रेन धावली नाही

मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे बुधवारी मध्य रेल्वे मार्गावर एकही श्रमिक विशेष ट्रेन धावली नाही. यासह मध्य रेल्वे मार्गावरील 200 विशेष ट्रेनमधील काही ट्रेनच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे मुंबई शहर आणि उपनगरांना सतर्कतेचा इशारा दिला होता. मध्य रेल्वे प्रशासनाने देखील मजुरांसाठी चालविण्यात येणाऱ्या श्रमिक विशेष ट्रेन बुधवारी न चालविण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्यांने दिली. बुधवारी, हजरत निजामुद्दीन ते एर्नाकुलम विशेष ट्रेन मनमाड-दौंड व्हाया पुणे-मिरज-लोंडा-मडगाव या मार्गे चालविण्यात आली, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. 

दुसरीकडे अलिबागच्या किनारपट्टीवर दुपारी एकच्या सुमारास धडकलेलं चक्रीवादळ सध्या ठाणे, पालघर पट्ट्यात आहे. इथून ते पुढे उत्तर महाराष्ट्राच्या दिशेनं जाण्याची शक्यता आहे.  वादळ मुंबईच्या बाजूनं थोडं पुढे सरकलेलं असलं तरीही हवामान विभागानं दिलेला धोक्याचा इशारा कायम आहे. त्यामुळे पुढील काही तास मुंबईसाठी अतिशय महत्त्वाचे असतील. 

निसर्ग चक्रीवादळामुळे सकाळपासून मुंबई शहर आणि उपनगरात पावसाचा जोर कायम होता. शिवाय सातत्याने वाहत असलेल्या वाऱ्याचा वेगही कायम होता. दुपारी पावसाचा आणि वाऱ्याचा वेग वाढू लागला असतानाच ठिकठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. मुंबई शहर आणि उपनगरातील समुद्र किनारी राहत असलेल्या, पश्चिम किनारपट्टीवरील, धोकादायक व समुद्र किना-यानजीकच्या वस्त्यांतील नागरिकांचे स्थलांतर करुन त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याबाबतचे निर्देश देण्यात आले होते. महापालिकेतर्फे सुमारे ३५ शाळा आतापर्यंत नागरिकांच्या तात्पुरत्या निवाऱ्यासाठी निश्चित करण्यात होत्या. याव्यतिरिक्त नियंत्रण कक्षात असलेल्या ५ हजारापेक्षा अधिक कॅमेऱ्यांद्वारे  घडामोडींवर नजर ठेवण्यात आली होती. पाणी साचण्याच्या संभाव्य ३०० पेक्षा अधिक ठिकाणी पाणी उपसा करण्यासाठी पंप उपलब्ध करण्यात आले होते.

हेही वाचा

गुजरातमध्ये केमिकल फॅक्टरीत स्फोट; पाच जणांचा मृत्यू, ३२ जखमी

Cyclone Nisarga: चक्रीवादळ अलिबागच्या किना-यावर धडकले; पुढचे २-३ तास महत्त्वाचे- बाळासाहेब थोरात 

मोदींच्या मंत्रिमंडळाची दोन अध्यादेशांना मंजुरी; शेतकऱ्यांसाठी 'एक देश एक बाजार' धोरण 

लडाख भारताचा अविभाज्य भाग, सीमेवर शांती महत्त्वाची; तिबेटच्या निर्वासित पीएमचा चीनवर हल्लाबोल

Cyclone Nisarga: संकटाच्या छाताडावरती चाल करून जायचंय, उद्धव ठाकरेंचा जनतेला कानमंत्र 

Cyclone Nisarga: उद्यापासून २ दिवस घराबाहेर पडायचं नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगितला निसर्गाचा धोका

Nisarga Cyclone: निसर्ग चक्रीवादळाचा पावणे दाेन लाख लोकांना फटका बसणार?; 60 हजार जणांना स्थलांतरित करणार

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Cyclone Nisarga also hit the railways; No labor train ran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.