महाराष्ट्रात सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणात कमालीची वाढ; कंट्रोल सेंटरला दररोज तब्बल ७,००० पेक्षा जास्त कॉल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 12:21 IST2026-01-27T12:20:23+5:302026-01-27T12:21:48+5:30
Amravati : गुन्हेगारांनी अवलंबलेले नवनवीन मार्ग, ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमुळे हेल्पलाईनवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. या तातडीच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी गृह विभागाने पावले उचलली आहेत.

Cybercrime cases in Maharashtra rise sharply; more than 7,000 calls to control center every day
प्रदीप भाकरे
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्यात सायबर फसवणूक गुन्ह्यांच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली आहे. महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पाच्या 'कमांड अँड कंट्रोल सेंटर'ला दररोज तब्बल ७,००० पेक्षा जास्त कॉल प्राप्त होत आहेत. ही संख्या प्रकल्पाच्या सुरुवातीला अपेक्षित असलेल्या क्षमतेपेक्षा कित्येक पटीने जास्त आहे.
गृह विभागाने उचलली पावले
- गुन्हेगारांनी अवलंबलेले नवनवीन मार्ग, ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमुळे हेल्पलाईनवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. या तातडीच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी गृह विभागाने पावले उचलली आहेत.
- सायबर फसवणूक झाल्यास नागरिकांनी तत्काळ अधिकृत हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
कशी होतेय फसवणूक? केवायसी अपडेट, क्युआर कोड
स्कॅन, लोन अॅप स्कॅम, शेअर फ्रॉड, डिजिटल अरेस्ट, फेक प्रोफाईल, हॅकिंग, सायबर बुलिंग- स्टॉकिंग, फिशिंग आणि मालवेअर, सेक्सटॉर्शन, एपीके फाईल, इ चालान फ्रॉड आदी.