टिळक भवनावर इच्छुकांची गर्दी

By Admin | Updated: August 20, 2014 00:43 IST2014-08-20T00:43:21+5:302014-08-20T00:43:21+5:30

मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी मुलाखतींसाठी टिळक भवनावर केलेली गर्दी पाहता काँग्रेसमध्येही उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येते.

A crowd of aspirants on Tilak Bhawan | टिळक भवनावर इच्छुकांची गर्दी

टिळक भवनावर इच्छुकांची गर्दी

मुंबई : मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी मुलाखतींसाठी टिळक भवनावर केलेली गर्दी पाहता काँग्रेसमध्येही उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येते.
काँग्रेसच्या प्रदेश निवडणूक समितीकडे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत. टिळक भवनात मंगळवारी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील 53 जागांवरील मुलाखतींसाठी 5क्क् इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. मंत्री, विद्यमान आमदारांसह ज्येष्ठ नेत्यांचाही त्यात समावेश होता. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, समन्वय समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, सहप्रभारी बालाराम बच्चन आणि श्योराज वाल्मीकी आदी नेते उपस्थित होते. 2क्क्9 साली मराठवाडय़ातील एकूण 46 जागांपैकी 26 जागांवर काँग्रेसने तर 2क् जागांवर राष्ट्रवादीने निवडणूक लढविली होती. पैकी काँग्रेसचे 18 आणि राष्ट्रवादीचे 12 उमेदवार निवडून आले. तर, पश्चिम महाराष्ट्रातील 58 जागांपैकी काँग्रेसकडे 27 आणि राष्ट्रवादीकडे 31 जागा होत्या. या भागातून काँग्रेसचे 12 तर राष्ट्रवादीचे 2क् उमेदवार निवडून आले. (प्रतिनिधी)  
 
 इंदापूरमध्ये एकच अजर्
इंदापूर मतदारसंघातून सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आणि भोर मतदारसंघातील विद्यमान आमदार संग्रामसिंग थोपटे यांच्याशिवाय इतर कुणीही इच्छुक उमेदवार नव्हते.
मुख्यमंत्र्यांसाठी 
मतदारसंघाची मागणी
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना वाई अथवा दक्षिण कराड मतदारसंघातून उमेदवारी देण्याची मागणी करणारे निवेदन सातारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष आनंद पाटील यांनी आज निवडणूक समितीला सादर केले. वाईसाठी 11 तर कराड दक्षिणसाठी 2 इच्छुकांनी अर्ज दिले असून, यात मुख्यमंत्र्यांचा अर्ज नसल्याचे समजते.  

 

Web Title: A crowd of aspirants on Tilak Bhawan