शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये पीक विमा सापडला संकटात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 06:24 IST

सहा वेळा निविदा; नुकसानभरपाईसाठी लक्ष्य केल्याने कंपन्यांचा असहकार

- अरुण बारसकरसोलापूर : पीक विम्याच्या भरपाईसाठी विमा कंपन्यांना लक्ष्य केल्याचा परिणाम म्हणून की काय, रब्बी हंगामासाठी राज्यातील १० जिल्ह्यांत एकाही विमा कंपनीने पीक विम्यासाठी स्वारस्य दाखवले नाही. कृषी आयुक्त स्तरावर सहा वेळा निविदा प्रसिद्ध केल्यानंतरही विमा कंपन्या पुढे आल्या नसल्याने शेतकऱ्यांना या वर्षी पीक विम्याची रक्कम भरता येणार की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.खरीप व रब्बी या हंगामासाठी पीक विमा भरण्यासाठी केंद्र सरकारने १८ कंपन्या निश्चित केल्या आहेत. राज्यातील ३४ जिल्ह्यांसाठी कृषी आयुक्त स्तरावर पीक विम्यासाठी खरीप व रब्बी हंगामासाठी निविदा काढली जाते. यामध्ये केंद्राच्या यादीत असलेल्या कंपन्यांनाच निविदा भरता येते. कृषी आयुक्त स्तरावर सप्टेंबर महिन्यापासून टेंडर काढण्यास सुरुवात केली.सलग सहा वेळा टेंडर काढूनही सोलापूर, बीड, हिंगोली, लातूर, वाशिम, भंडारा, रत्नागिरी, चंद्रपूर, गडचिरोली, सिंधुदुर्ग या १० जिल्ह्यांसाठी एकाही कंपनीने निविदा भरली नाही. रब्बी हंगाम सुरू होऊनही पीक विमा भरण्यासाठी कंपन्यांनी नकारघंटा दाखविल्याने वरील १० जिल्हतील शेतकऱ्यांना यावर्षी विम्याची रक्कम भरता येणार नाही.रब्बी हंगामबहुल जिल्ह्यातच शिवाय यावर्षी पाऊस उशिराने पडल्याने रब्बी हंगाम कालावधीत आता कुठे पिके घेण्यास सुरुवात झाली असताना विम्यासाठी कंपन्यांचा सहभाग नसल्याने राज्य शासनाने केंद्राकडे प्रस्ताव पाठविला आहे. सहावेळा फेरनिविदा काढूनही कंपन्या सहभागासाठी नाखूश असल्याने आपल्या स्तरावर निर्णय घेण्याचे पत्र केंद्र सरकारला पाठविण्यात आले आहे. आता केंद्र सरकारच्या निर्णयावर राज्यातील १० जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचा विमा अवलंबून आहे. मागील दोन वर्षांपासून विमा कंपन्यांना राजकीय नेत्यांनी लक्ष्य केल्याचा हा परिणाम असल्याचे बोलले जाते.शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नकापीक विम्याचा कायदा असताना कंपन्या निविदा भरत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. केंद्र सरकारने स्वत:च पीक विम्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करावी. केंद्राने व राज्याने अर्थसंकल्पात यासाठी तरतूद करावी. फायदा झाला तर सरकारला व तोटा झाला तर सरकारचाच. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही. शेतकरी मोठा खर्च करुन पिके आणतो; मात्र आपत्तीमुळे एका रात्रीत पिके जमीनदोस्त होतात. केंद्राने तातडीने निर्णय घ्यावा. - राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना़

टॅग्स :Crop Insuranceपीक विमा