शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडीत खाते बदलावरून धुसफूस; अजित पवार- अशोक चव्हाणांमध्ये खडाजंगी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 08:39 IST

महाराष्ट्र विकास आघाडीच्या मंत्रीमंडळाचे आज खातेवाटप जाहीर होणार होते.

मुंबई : महाविकास आघाडीतील खातेवाटपाचा तिढा सुटताना दिसत नसून काल रात्री झालेल्या 4 तासांच्या बैठकीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्यामध्ये खडाजंगी झाल्याचे समजते. 

महाराष्ट्र विकास आघाडीच्या मंत्रीमंडळाचे आज खातेवाटप जाहीर होणार होते. मात्र, काँग्रेसला कृषीखाते हवे आहे. कारण अशोक चव्हाण आणि बाळासाहोब थोरात यांना मोठी खाती द्यायची आहेत. यावेळी चर्चेत अजित पवार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा विषय काढला. यावर अशोक चव्हाण यांनी आक्षेप घेत ते मंत्रीमंडळात नाहीत. मग त्यांचा इथे संबंध काय असा प्रश्न विचारला. यानंतर अजित पवारांनीही आधी तुमचा नेता ठरवा, मग बोलू, असे म्हटल्याने चव्हाण तेथून निघून गेल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे. 

यावर पुरातन बंगल्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितले की, जे पालकमंत्री होणार आहेत त्यांची नावे उद्या जाहीर केली जातील. खातेवाटपाचा निर्णय झाला. काही खात्यांवर वेगवेगळे मतमतांतर आहे. यामुळे असे ठरले की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यामध्ये निर्णय घेतील, असे अजित पवार यांनी पत्रकारांना सांगितले. मतमतांतरावरून बैठकीत खडाजंगी झाल्याचे संकेत त्यांनी दिले. 

तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही मुख्यमंत्र्यांना खातेबदलाचा प्रस्ताव दिला आहे. ते यावर निर्णय घेतील, असे सांगितले. या बैठकीला मुख्यमंत्री उपस्थित नव्हते, पण त्यांच्याशी बैठकीतील चर्चा फोनवर केल्याचे शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच खातेबदलावर मुख्यमंत्रीच निर्णय़ घेतील, असे सांगितले. तर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आजच खातेवाटप होईल, असे स्पष्ट केले आहे.  

टॅग्स :maharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीAjit Pawarअजित पवारAshok Chavanअशोक चव्हाणPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणUddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना