जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 20:41 IST2025-09-28T20:40:35+5:302025-09-28T20:41:41+5:30
Jalgaon Crime News: जळगावच्या माजी महापौरांच्या फार्म हाऊसमध्ये बनावट कॉल सेंटर सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार आज पोलिसांनी टाकलेल्या धाडीतून उघडकीस आला आहे.

जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
जळगावच्या माजी महापौरांच्या फार्म हाऊसमध्ये बनावट कॉल सेंटर सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार आज पोलिसांनी टाकलेल्या धाडीतून उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी जळगावचे माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह आठ जणांना अटक केली आहे. घटनास्थळावरून सुमारे ३२ लॅपटॉप आणि ८ मोबाईलसह इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत मिळावेल्या अधिक माहितीनुसार जळगावमधील मुराबाद रोडवर माजी महापौर ललित कोल्हे यांचं फार्म हाऊस असून, या फार्म हाऊसमध्ये उघडण्यात आलेल्या बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून परदेशातील लोकांशी संपर्क साधून त्यांची ऑनलाईन फसवणूक केली जात होता. पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली तेव्हा त्यांना धक्काच बसला.
या फार्महाऊसमध्ये बोगस कॉल सेंटर उघडण्यात आलेले होते. तसेच तिथे परराज्यातील तरुण काम करत होते. पोलिसांनी कारवाईदरम्यान, माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह एकूण ८ जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच तिथून ३२ लॅपटॉप आणि ८ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. ललित कोल्हे हे सध्या शिवसेना शिंदे गटात असून, त्यांच्यावर याआधीही अनेकदा गंभीर आरोप झालेले होते.