लग्न जुळत नसल्याचा संताप, मुलाच्या हल्ल्यात पिता ठार, लाखांदूर तालुक्यातील अथली गावात घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 12:12 IST2025-11-09T12:12:45+5:302025-11-09T12:12:52+5:30
Crime News: मोठा भाऊ बिनालग्नाचा. लहानाचे वय वाढलेले. तरीही वडिलांकडून लग्न लावून दिले जात नसल्याच्या वादातून मुलाने वडिलांच्या डोक्यावर वीट घातली. यात त्यांचा मृत्यू झाल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील आथली या गावात घडली. शुक्रवारी (७नोव्हेंबर) रात्री ८ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

लग्न जुळत नसल्याचा संताप, मुलाच्या हल्ल्यात पिता ठार, लाखांदूर तालुक्यातील अथली गावात घटना
लाखांदूर - मोठा भाऊ बिनालग्नाचा. लहानाचे वय वाढलेले. तरीही वडिलांकडून लग्न लावून दिले जात नसल्याच्या वादातून मुलाने वडिलांच्या डोक्यावर वीट घातली. यात त्यांचा मृत्यू झाल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील आथली या गावात घडली. शुक्रवारी (७नोव्हेंबर) रात्री ८ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
पुरुषोत्तम कुंभलवार (५७) असे मृताचे तर, प्रदीप पुरुषोत्तम कुंभलवार (३३) असे मुलाचे नाव आहे. पोलिसांनी रात्रीच त्याला खुनाच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पभूधारक शेतकरी असलेल्या पुरुषोत्तमला दोन मुले आहेत. ते सर्व शेतकरी म्हणून काम करतात. शुक्रवारी, रात्री ८ वाजता घरी जेवण झाल्यानंतर पुरुषोत्तम, त्याची पत्नी रेवता (५१) आणि धाकटा मुलगा प्रदीप घरात गप्पा मारत बसले होते. मोठा मुलगा प्रेमकुमार (३५) बाहेर गेला होता. या दरम्यान, प्रदीपने वडिलांसोबत वाद घातला. तुम्ही म्हातारे झाला आहात, आम्ही अजूनही अविवाहित आहोत. लग्न कधी लावून देणार?, असे विचारल्यावरून वाद वाढला. रागाच्या भरात त्याने वडिलांच्या डोक्यावर विटेने वार केला. त्यामुळे रक्तस्त्राव होऊन ते बेशुद्ध पडले. रेवता कुंभलवार यांच्या तक्रारीवरून, लाखांदूर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आणि प्रदीपला अटक केली.