जळगाव: शासकीय कामात अडथळा; माजी आमदार संतोष चौधरींविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2021 00:33 IST2021-06-15T00:32:44+5:302021-06-15T00:33:31+5:30
शासकीय कामात अडथळा आणला म्हणून चौधरी यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव: शासकीय कामात अडथळा; माजी आमदार संतोष चौधरींविरुद्ध गुन्हा
भुसावळ: भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी व नपा मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्यात जोरदार शाब्दिक वाद होऊन प्रकरण शिवीगाळ व हमरीतुमरीपर्यंत गेले. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणला म्हणून चौधरी यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ रोजी सायंकाळी चिद्रवार हे टिंबर मार्केटमधील सर्व्हे नंबर २०६ सर्वेादय छात्रालयाच्या जागेवरील अवैध कामाची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्याचवेळी तिथे संतोष चौधरी हेही पोहोचले. यावेळी दोघांमध्ये वाद व शिवीगाळ झाली. यानंतर चिद्रवार हे रात्री नऊ वाजेच्या सुमारास बाजारपेठ पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी झालेला प्रकार डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक दिलीप
भागवत यांना सांगितला. यानंतर शासकीय कामात अडथळा आणला म्हणून माजी आमदार संतोष चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.