नाशिक : हल्ली मी सहकारी पतसंस्था आणि बँकांच्या उद्घाटन कार्यक्रमाला जाण्यास घाबरतो. कारण पतसंस्था किंवा बँक बुडाली तर सभासद आणि ठेवीदार थेट घरापर्यंत येतात, अशी कोपरखळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेच्या प्रशासकीय कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी मारली.सद्य:स्थितीत पतसंस्था आणि बँकांचे उद्घाटन केल्यानंतर बरेचदा काही महिन्यांतच त्यांना टाळे लागते. त्यामुळे लोकांचा सहकारावरील विश्वास उडाला आहे. मोठ्या कष्टाने लोकांनी पैसे उभारून बँकेत ठेवलेले असतात. घोटाळ््यांमुळे ठेवी बुडालेल्या माणसांची अवस्था भिकाऱ्यासारखी होते. संचालक मंडळाने नातलगांना कर्ज न वाटता सामाजिक बांधिलकेचे भान ठेवून विश्वस्तासारखे राहिले पाहिजे. त्यातल्या त्यात राजकीय पुढाऱ्यांनी, तर सहकारी बँक काढूच नयेत, अशी टोलेबाजीही महाजन यांनी केली.ही बँक शासकीय कर्मचाऱ्यांची असल्याने आतापर्यंत टिकून आहे, असेही ते म्हणाले. बँकेचे संचालक सुधीर पगार यांनी बँकांकडून टीडीएस कपातीचा निर्णय सरकारने घेतला असून, हा निर्णय अन्यायकारक असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)
पतसंस्था, बँकांचे उद्घाटन करण्यास घाबरतो !
By admin | Updated: June 20, 2015 00:21 IST
हल्ली मी सहकारी पतसंस्था आणि बँकांच्या उद्घाटन कार्यक्रमाला जाण्यास घाबरतो. कारण पतसंस्था किंवा बँक बुडाली तर सभासद आणि ठेवीदार थेट
पतसंस्था, बँकांचे उद्घाटन करण्यास घाबरतो !
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}