शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्यांनाच समुपदेशनाची गरज

By admin | Updated: May 15, 2015 02:20 IST

प्रदीर्घ कालावधीनंतर भाजपा-शिवसेनेला सत्ता मिळाल्याने सरकारमधील मंत्री आणि नेते मानसिक संतुलन ढासळल्यासारखे वागत

मुंबई : प्रदीर्घ कालावधीनंतर भाजपा-शिवसेनेला सत्ता मिळाल्याने सरकारमधील मंत्री आणि नेते मानसिक संतुलन ढासळल्यासारखे वागत आहेत. म्हणूनच सत्ताधाऱ्यांच्या वादग्रस्त विधानांची मालिका सुरू आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी समुपदेशनाची गरज असल्याचे सांगत आहेत. शेतकऱ्यांपेक्षा, वादग्रस्त विधाने करून शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणाऱ्या मंत्र्यांनाच समुपदेशनाची जास्त गरज असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केली.राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे एकीकडे म्हणतात की, शेतकऱ्यांकडे मोबाइलचे बिल भरण्यासाठी पैसे असतात मग ते विजेचे बिज का भरू शकत नाहीत? दुसरीकडे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी शेतकऱ्यांनी आता सरकारकडून मदतीची अपेक्षा ठेवू नये असे सांगतात. हेच नितीन गडकरी शेतकऱ्यांना शेतीसाठी मानवी मूत्राचा वापर करा, त्यामुळे शेतीतून भरघोस उत्पादन मिळते असा सल्ला देतात; आणि त्यांचीच री ओढत कृषिमंत्री एकनाथ खडसे मल्टिप्लेक्समधील मलमूत्राचे संकलन करून शेतीसाठी कसे वापरता येईल यासंदर्भात सरकार प्रयत्न करणार असल्याचा मानस व्यक्त करतात. अशा प्रकारे भाजपा सरकारमधील नेतेमंडळी नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम करीत आहे.