शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

अहवालाच्या सभेला नगरसेवकांचीच दांडी

By admin | Updated: June 10, 2016 00:57 IST

मुख्यसभेने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेले अनेक अहवाल सभेसमोर मांडलेच जात नाहीत

पुणे : मुख्यसभेने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेले अनेक अहवाल सभेसमोर मांडलेच जात नाहीत अशी तक्रार सातत्याने अहवाल मांडण्याची मागणी करणाऱ्या नगरसेवकांनी या अहवालांच्या सादरीकरणासाठी बोलावलेल्या विशेष सभेलाच दांडी मारल्याने गणसंख्येअभावी ही सभा तहकूब करावी लागली. प्रशासनाच्या गैरकारभाराचा जाब विचारण्यासाठी नगरसेवकांनी सातत्याने मागणी केलेली सभा अचानक तहकूब करून दोन महिन्यांसाठी पुढे ढकलल्याने पालिका वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नगरसेवकांकडून प्रलंबित अहवाल सादर करण्याची सातत्याने मागणी होत असल्याने महापौर प्रशांत जगताप यांनी ९ जून रोजी विशेष सभेचे आयोजन केले होते. या सभेमध्ये प्रशासनाकडून मुख्यसभेला सादर करावयाचे सर्व प्रलंबित अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. त्यानुसार प्रशासनाने ३४ प्रलंबित अहवाल मुख्यसभेला सादर केले होते. या अहवालांवर गुरुवारच्या मुख्यसभेत जोरदार चर्चा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. या सर्व अहवालांवर चर्चा होण्यासाठी रात्री उशिरपर्यंत विशेष सभा चालेल अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात गुरुवारी वेगळेच चित्र पाहायला मिळाले. या सभेला सुरुवात होताना सभागृहात सभागृह नेते बंडू केमसे, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, भाजपाचे गटनेते गणेश बिडकर, मनसेचे अजय तायडे, नीलम कुलकर्णी, शिवसेनेच्या कल्पना थोरवे, काँग्रेसचे संजय बालगुडे आदी नगरसेवक उपस्थित होते. सभागृहामध्ये हाताच्या बोटावर मोजण्याइतपत नगरसेवक उपस्थित असल्याने गणेश बिडकर यांनी नगरसेवकांच्या गणसंख्येचा मुद्दा उपस्थित केला. सभागृहात अवघे सात नगरसेवक हजर असल्यामुळे पुरेशा गणसंख्येअभावी सभा तहकूब करण्यात आली. आता ही सभा २२ आॅगस्ट रोजी होणार आहे. >मनसे गटनेते बाबू वागस्कर, आबा बागुल, सुभाष जगताप, अविनाश बागवे, डॉ. सिद्धार्थ धेंडे, किशोर शिंदे व काही नगरसेवकांनी विविध विषयांवर अहवाल आणि माहिती मागितली होती.शहरातील हॉस्पिटलनी केलेले अनधिकृत बांधकाम, मागील तीन वर्षांत नेमलेले सल्लागार आणि त्यांच्यावर झालेला खर्च, ठेकेदार नितीन वरघडे यांच्या कामाचा चौकशी अहवाल, महापालिकेची उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे, पालिकेचे थकीत भाडे आणि कराराचा तपशील, एसआरए योजनेतून महापालिकेला मिळालेल्या सदनिका असे प्रलंबित ३४ अहवाल मुख्यसभेकडे सादर करण्यात आले होते. या अहवालामधील चुकीच्या गोष्टींवर चर्चा होऊन त्यावर निर्णय होणे अपेक्षित होते.