Coronavirus Update : चोवीस तासांत राज्यात ९ हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित, तर ८ हजारांपेक्षा अधिक कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2021 10:08 PM2021-07-03T22:08:19+5:302021-07-03T22:09:16+5:30

Coronavirus In Maharashtra : राज्यात चोवीस तासांत १५३ जणांचा मृत्यू.

Coronavirus Update More than 9000 corona patients found in the state more than 8000 recovered | Coronavirus Update : चोवीस तासांत राज्यात ९ हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित, तर ८ हजारांपेक्षा अधिक कोरोनामुक्त

Coronavirus Update : चोवीस तासांत राज्यात ९ हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित, तर ८ हजारांपेक्षा अधिक कोरोनामुक्त

Next
ठळक मुद्देराज्यात चोवीस तासांत १५३ जणांचा मृत्यू.मुंबईत कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहाकार माजला होता. महाराष्ट्राला याचा सर्वाधिक फटका बसला होता. सध्या कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी गेल्या काही दिवसांपासून ती ८ ते ९ हजारांपेक्षा कमी जास्त होताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात ९ हजार ४८९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर दुसरीकडे ८,३९५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर चोवीस तासांत राज्यात १५३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


राज्यात आजपर्यंत एकूण ५८,४५,३१५ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्के एवढं झालं आहे. राज्यात सध्या १,१७,५७५ रुग्णआंवर उपचार सुरू आहेत. सध्या राज्यात ६,३२,९४९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,४२२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक
गेल्या चोवीस तासांत मुंबईत ८५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर दुसरीकडे ५७५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर ९६ टक्के इतका आहे. मुंबईत सध्या ८,२९७ रुग्णांवर उपचार सुरू असून रुग्ण दुपटीचा कालावधी ७५२ दिवस इतका झाला आहे.

Web Title: Coronavirus Update More than 9000 corona patients found in the state more than 8000 recovered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.