Coronavirus Update : दिवसभरात ५,९१६ रुग्ण कोरोनामुक्त; रिकव्हरी रेट ९७ टक्क्यांच्या वर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 09:36 PM2021-09-05T21:36:57+5:302021-09-05T21:38:03+5:30

Coronavirus Updates In Maharashtra : दिवसभरात राज्यात ४ हजार ५७ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत.

Coronavirus Update: 5,916 patients free of coronavirus in a day; Recovery rate above 97% | Coronavirus Update : दिवसभरात ५,९१६ रुग्ण कोरोनामुक्त; रिकव्हरी रेट ९७ टक्क्यांच्या वर

Coronavirus Update : दिवसभरात ५,९१६ रुग्ण कोरोनामुक्त; रिकव्हरी रेट ९७ टक्क्यांच्या वर

Next
ठळक मुद्देदिवसभरात राज्यात ४ हजार ५७ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत.

Coronavirus In Maharashtra : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही. गेल्या चोवीस तासांत ५,९१६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचा दर आता ९७ टक्क्यांवर गेला आहे. तर गेल्या चोवीस तासांत राज्यात ४ हजार ५७ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. 

गेल्या चोवीस तासांमध्ये राज्यात ४ हजार ५७ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. दुसरीकडे ५,९१६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर चोवीस तासांत ६७ करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूंची नोंदही करण्यात आली. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर  ९७.०५ टक्के एवढा झाला आहे. आता राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ६४,८६,१७४ झाली आहे. आजर्यंत राज्यात १,३७,७७४ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.


मुंबईत ४९६ नव्या रुग्णांची नोंद
गेल्या चोवीस तासांमध्ये मुंबईत ४९६ रुग्णांची नोंद झाली आहे. तर २९७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत ३,८१५ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर दुसरीकडे रुग्ण दुपटीचा कालावधी १३६३ दिवस इतका झाला आहे. आतापर्यंत मुंबईत ७ लाख २४ हजार ०७७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

Web Title: Coronavirus Update: 5,916 patients free of coronavirus in a day; Recovery rate above 97%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.