Coronavirus Update : २४ तासांत राज्यात ५,४२४ रुग्णांची कोरोनावर मात; रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांच्या जवळ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 10:28 PM2021-08-17T22:28:36+5:302021-08-17T22:31:08+5:30

Coronavirus In Maharashtra : चोवीस तासांत नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक. रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांच्या जवळ.

Coronavirus Update 5424 patients overcome coronavirus in 24 hours in the state recovery rate is close to 97 percent | Coronavirus Update : २४ तासांत राज्यात ५,४२४ रुग्णांची कोरोनावर मात; रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांच्या जवळ

Coronavirus Update : २४ तासांत राज्यात ५,४२४ रुग्णांची कोरोनावर मात; रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांच्या जवळ

Next
ठळक मुद्देचोवीस तासांत नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक. रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांच्या जवळ.

राज्यातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरताना दिसत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला होता. परंतु आता राज्य त्यातून बाहेर येताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची अधिक नोंद करण्यात आली. चोवीस तासांत राज्यात ५ हजार ४२४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर ४ हजार ४०८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात ११६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

आजपर्यंत राज्यात एकूण ६२,०१,१६८ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८७ टक्क्यांवर पोहोचले आहे. आतापर्यंत राज्यात एकूण ६४,०१,२१३ कोरोनाबाधितांची नोंद झाली.


मुंबईतही कोरोनामुक्त अधिक
मुंबईतही आता कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात येताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासांत मुंबईतही कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक असल्याचं दिसून आलं. गेल्या चोवीस तासांत मुंबईत १९८ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे ३०४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर आता ९७ टक्के इतका आहे. मुंबईत सध्या २,६४० रूग्णांवर उपचार सुरू असून रुग्ण दुपटीचा कालावधी आता १९८६ दिवस इतका झाला आहे.

Web Title: Coronavirus Update 5424 patients overcome coronavirus in 24 hours in the state recovery rate is close to 97 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.