Coronavirus: The supply of essential commodities will remain constant - Pawar | Coronavirus : जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा कायम राहणार - अजित पवार

Coronavirus : जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा कायम राहणार - अजित पवार

मुंबई : ह्यकोरोनाह्णच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी केलेल्या देशभर ह्यलॉकडाऊनह्णच्या घोषणेचं पालन करुन नागरिकांनी घरीच थांबावं, परंतु याचा दुध, भाजीपाला, फळे, औषधै, अन्नधान्य आदी जीवनावश्यक वस्तुंच्या पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही. हा पुरवठा यापुढेही पूर्ववत नियमित सुरु राहील. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जावू नये, घराबाहेर पडून खरेदीसाठी गर्दी करु नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर २१ दिवसांच्या ह्यलॉकडाऊनह्णची घोषणा केली असली तरी आपल्या राज्यात आधीपासूनच संचारबंदी लागू आहे. संचारबंदीच्या काळातही नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कायम ठेवण्याबाबत सरकारने खबरदारी घेतली आहे. राज्यातील गरीब, दुर्बल घटकांना रेशन दुकानांवरुन तीन महिन्यांचे अन्नधान्य उपलब्ध करण्याचाही विचार सुरु आहे. राज्य सरकार जनतेची कुठलीही अडचण होऊ देणार नाही, जीवनावश्यक वस्तूंची टंचाई भासू देणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी दिला.
मुख्यमंत्री महोदयांनी राज्यात लागू केलेल्या संचारबंदीचं पालन करुन नागरिकांनी घरीच थांबावं, घराबाहेर पडून ह्यकोरोनाह्णच्या संसगार्ला बळी पडू नये, हा संसर्ग आपल्या घरच्यांपर्यंत नेऊ नये, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे. नागरिकांच्या सोयीसाठी दवाखाने, हॉस्पिटल, वैद्यकीय सेवा आणि अत्यंत निकडीच्या वेळी वाहतुकसेवाही उपलब्ध केली जाईल. नागरिकांच्या प्रत्येक अडचणीत सरकार त्यांच्यासोबत आहे, परंतु आता प्रत्येकानं आपापल्या घरात थांबूनच पंतप्रधान आणि मुख्यमंत्री महोदयांच्या आवाहनाचं पालन करावं, घरीच थांबावं, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

‘आणखी कठोर पावलं उचलायला भाग पाडू ’
संचारबंदीसारखे निर्णय राज्य सरकारनं जनतेच्या हितासाठीच घेतले आहेत. यामध्ये कुणाचा वैयक्तिक स्वार्थ असण्याचं काही कारण नाही.आणखी कठोर पावलं उचलायला भाग पाडू नका... कृपया घरीच रहा... अशी विनंती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. मास्क किंवा औषधांची अवैध साठेबाजी करणा?्या असामाजिक घटकांवर कठोर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशाराही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.

Web Title: Coronavirus: The supply of essential commodities will remain constant - Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.