शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

CoronaVirus ‘ते’ तबलिगी समोर न आल्यास कठोर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 05:54 IST

गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती; मोबाइल स्विच आॅफ केलेल्यांचाही सुरू आहे शोध

विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : तबलिगी जमातीचे जे लोक दिल्लीच्या मरकजहून परतले त्यांच्यापैकी महाराष्ट्रात परतलेल्या १,३५५ जणांची ओळख पटविण्यात आली आहे. त्यापैकी १३०० जणांच्या आवश्यक चाचण्या करून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत वा त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. जे लोक स्वत:हून हजर होणार नाहीत त्यांचा आम्ही शोध घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा गृहमंत्री आनिल देशमुख यांनी दिला आहे.

‘लोकमत’शी बोलताना देशमुख म्हणाले की, त्यांच्यापैकी ५०-५५ लोक असे आहेत की ज्यांना अद्याप ताब्यात घेता आलेले नाही किंवा ते स्वत:हून हजर झालेले नाहीत. बहुतेकांनी मोबाईल स्विच आॅफ केलेले आहेत. त्यामुळे त्यांना शोधण्यात अडचणी येत आहेत. मोबाईल स्विच आॅफ असला तरी त्याचा ठावठिकाणा आजकाल काढता येतो. सायबर सेलच्या माध्यमातून तसे प्रयत्न केले जात आहेत. लवकरच त्याला यश येईल. दिल्लीच्या मरकजमध्ये महाराष्ट्रातून जे लोक गेले होते त्यांची नावे, पत्ते आम्ही दिल्लीतून मिळवले, त्यानुसार शोध मोहीम राबविली. काहीजण स्वत:हून पोलीस व आरोग्य यंत्रणेकडे हजर झाले व त्यांनी सहकार्य केले.

लाठी वापरण्यास भाग पाडू नकालॉकडाऊनच्या काळात बंदी आदेश मोडून लोक बेफाम फिरत असतील तर लाठी चालवावीच लागेल, याचा देशमुख यांनी पुनरुच्चार केला. ते म्हणाले, बेफाम लोकांनी पोलिसांवर हल्ल्याच्या ४८ घटना घडल्या आहेत. त्यात शंभरावर लोकांना अटक करण्यात आली.बंदी मोडणाऱ्या नागरिकांची ७,५७० वाहने जप्त केली आहेत. ६६ लाख रुपयांचा दंडही आकारला आहे.

११ हजार कैद्यांची पॅरोलवर सुटकाकारागृहात असलेले ११ हजार आरोपी व कैदी यांच्या पॅरोलबाबतही सर्व ६० कारागृहांना निर्देश देऊन कैद्यांच्या गुन्हे व झालेल्या शिक्षेच्या अनुषंगाने पॅरोलवर सोडण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी असे सूचित केले. त्यानुसार हे कैदी पॅरोलवर सुटत आहेत.

सायबर गुन्ह्यास अटकावक्वारंटाईनबाबत जे चुकीचे संदेश समाज माध्यमाद्वारे पसरविण्यात येत होते त्यांनाही आळा बसला आहे. या चुकीच्या संदेशांबाबत ३४७ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे . तसेच भादविच्या कलम १८० नुसार २३ हजार १२६ घटनांची नोंद झाली आहे.कोरोनासंदर्भात समाज माध्यमावर होत असलेल्या अपप्रचारास अटकाव करण्याचे निर्देश दिल्यामुळे यात एप्रिल फुलसारख्या संदेशांनाहीरोख लागला.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAnil Deshmukhअनिल देशमुख