CoronaVirus police not to investigate the suspect's death | CoronaVirus संशयित मृत्यूची चौकशी न करण्याची पोलिसांना मुभा

CoronaVirus संशयित मृत्यूची चौकशी न करण्याची पोलिसांना मुभा

मुंबई : कोरोना  पार्श्वभूमीवर रुग्णालयात दाखल  झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीची पोलीस यंत्रणेमार्फत  होणारी चौकशी (Inquest) न  करण्याची मुभा पोलीसांना देण्यात आली आहे.
       सध्याच्या परिस्थितीमध्ये अशा प्रकारचा मृत्यू झाल्यानंतर डॉक्टर, वैद्यकीय यंत्रणा, नर्सेस ,तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याची अधिक शक्यता आहे.  त्यामुळे  शासनाने हा निर्णय घेतला आहे.
      साथरोग नियंत्रण कायदा १८९७ मधील भाग 2 सह आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदी अन्वय राज्यामध्ये निर्बंध असेपर्यंत  हे आदेश लागू असणार आहेत .
गृहविभागाने नुकतेच या बाबत एक परिपत्रक  काढले असून त्याचा संकेतांक २०२००४०८१३४६४०९८२९असा आहे . शासनाच्या या www.maharashtra.gov.in  संकेतस्थळावर हे परिपत्रक उपलब्ध आहे.

Web Title: CoronaVirus police not to investigate the suspect's death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.